IMPIMP

Pune Parvati Police Station | दत्तवाडी पोलिस स्टेशनचे नामकरण, आता म्हणा पर्वती पोलिस स्टेशन

by nagesh
Pune Parvati Police Station | Renaming Duttawadi Police Station Now Parvati Police Station Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Parvati Police Station | दत्तवाडी पोलीस ठाण्याचे (Dattawadi Police Station) नवे नामकरण करण्यात आले असून त्याला आता पर्वती पोलीस ठाणे असे नाव देण्यात आले आहे. पर्वती टेकडीचे (Parvati Hills Pune) ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व विचारात घेऊन राज्य शासनाने (Maharashtra State Govt) हा निर्णय घेतला आहे. याबाबत शासनाच्या कक्ष अधिकारी रुपाली कबरे यांनी हा आदेश काढला आहे. (Pune Parvati Police Station)

स्वारगेट पोलीस ठाण्याची व्याप्ती आणि वाढते गुन्हे लक्षात घेऊन २००७ मध्ये स्वारगेट पोलीस ठाण्याचे (Swargate Police Station) विभाजन करुन दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याअगोदर याच पोलीस ठाण्यात दत्तवाडी पोलीस चौकी (Dattawadi Police Chowki) होती. दत्तवाडी पोलीस चौकी व दत्तवाडी पोलीस ठाणे यांच्या नामसाधम्यामुळे तेथील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याबाबतचे निवेदन पोलीस महासंचालक यांना मिळाले होते. त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलून पर्वती पोलीस ठाणे करण्याची विनंती केली. त्याअनुषंगाने शासनाने दत्तवाडीचे पर्वती पोलीस ठाणे असे नामकरण केले आहे.

 

Related Posts