IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Accident News | पिंपरी : भरधाव थार गाडीची दुचाकीला धडक, तिन अपघातात दोघांचा मृत्यू

by sachinsitapure
Accident

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Accident News | पुण्यात कल्याणी नगर अपघातानंतर (Kalyani Nagar Car Accident) अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नियमांचे उल्लंघन करुन सामान्य नागरिकांच्या अंगावर गाडी घालण्याच्या घटना वाढल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दररोज अपघाताच्या घटना घडत असून त्यामध्ये निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे, भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच्या पायावरून ट्रॅव्हल्स बस गेल्याने तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव थारची दुचाकीला धडक

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे फाटा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन मित्रांना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या थार गाडीची धडक बसली. यामध्ये विरभद्र रामराव शिरोळे (वय-38 रा. आंबी रोड, वराळे) या व्यक्तीचा मृत्यू झाला तर विभुती रंजन शाहु हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मयत विरभद्र यांच्या पत्नीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन थार चालक मयुर जालींदर साखरे (वय-30 रा. हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

खासगी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भोसरी येथील गावजत्रा मैदानात खासगी ट्रॅव्हल्स बसने एका तरुणाला धडक दिली. त्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हुसेनखा मेहताबखा पठाण (वय-42 रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक शुभम संजय सुरवसे (वय-25 रा. हडपसर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहेत. फिर्यादी यांचा मुलगा गाव जत्रा मैदानात नाश्ता करत असताना आरोपी सुरवसे याने त्याच्या ताब्यातील बस निष्काळजीपणे चालवत त्याला धडक दिली. बसचे चाक तरुणाच्या अंगावरुन गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

बसचे चाक तरुणाच्या पायावरुन गेले

डांगे चौक थेरगाव येथे ट्रॅव्हल बसचे चाक पायावरुन गेल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. निलेश ज्ञानशीन इनवाती (वय-32) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. निलेश डांगे चौकात रस्ता ओलांडत असताना त्यांना बसची धडक बसली. बसचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरुन गेल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी बस चालक अनिल जगन तेली (वय-47 रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Posts