IMPIMP

Pune PMC News – TDR | पुणे महानगरपालिका : समाविष्ट गावांमध्ये टीडीआर वापरास परवानगी दिल्याने टीडीआर ला सुगीचे दिवस

by nagesh
 Pune PMC Property Tax News | Now the municipal corporation's march to the income tax arrears! Will seal the income of big arrears, charge the businessmen for change of use

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News – TDR | समाविष्ट ३४ गावांमध्ये टीडीआर वापरण्यास परवानगी दिल्याने मागील सहा महिन्यांत
टीडीआर विक्रीच्या दरामध्ये चांगलीच वृद्धी झाली आहे. टीडीआरला अपेक्षित दर मिळू लागल्याने टीडीआरच्या बदल्यामध्ये भूसंपादनाला (Land
Acquisition) गती मिळेल अपेक्षा महापालिका प्रशासनाने (PMC Administration) व्यक्त केली आहे. (Pune PMC News – TDR)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महापालिका विकास आराखड्यातील आरक्षित जागा ताब्यात घेण्याच्या बदल्यात महापालिका संबधित जागा मालकांना हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर), एफएसआय आणि प्रसंगी रोख मोबदला देते. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रामुख्याने एसआरए डेव्हलप करणार्‍या विकसकांनाही टीडीआरच्या स्वरूपातच मोबदला देण्यात येतो. मागील काही वर्षामध्ये महापालिकेने टीडीआरच्या बदल्यात लाखो चौरस मीटर जागा संपादीत केली असून त्याठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या आहेत. परंतु मागील काही वर्षात बांधकाम क्षेत्रात आलेली मरगळ, टीडीआर वापराची नियमावली, शहरातील रिडेव्हलपमेंटमधील अडचणींमुळे टीडीआरचे दर कोसळले होते. अगदी सहा महिन्यांपुर्वीपर्यंत आरक्षित जमिनीच्या टीडीआरचे दर हे मूळ किंमतीपेक्षा ६० टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. तर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या टीडीआरचे दर देखिल मूळ किंमतीपेक्षा ४० टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. (Pune PMC News – TDR)

 

दरम्यान २०१७ नंतर टीडीआर वापराची झोन मर्यादा रद्द करण्यात आली. तसेच २०१७ आणि २०२० मध्ये महापालिकेमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला. या गावांचा विकास आराखडा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. मात्र, राज्य शासनाने मागीलवर्षी डिसेंबरमध्ये या गावांमध्येदेखिल टीडीआर वापराची परवानगी दिली आहे. यासोबतच कोरोनामध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बांधकाम व्यवसायाला चालना मिळावी तसेच रोजगाराला चालना मिळावी, यासाठी बांधकाम प्रिमियम टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत दिली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम परवानग्या घेण्यात आल्या. यामुळे टीडीआरची मागणी वाढली आणि दरही चांगला मिळू लागला आहे. आजमितीला आरक्षित जमिनीच्या टीडीआर मूळ किंमतीपेक्षा १५ ते २० टक्क्यांपर्यंत कमी दराने विकला जात आहे. तर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या टीडीआरचे दर मूळ किंमतीएवढाच झाल्याने टीडीआर धारकांना सुगीचे दिवस आले आहेत.

 

बाजारात सध्या झोपडपट्टी पुनर्वसनातील २ लाख ६ चौे. मी. तर आरक्षित जागेचा ६ लाख १९ हजार अखर्चित टीडीआर शिल्लक आहे. यापैकी २०२२-२३ या आर्थिक वर्षात झोपडपट्टी पुनर्वसनातील ५७ हजार २४० चौ.मी. तर आरक्षित जागेचा १ लाख ६२ चौ.मी. टीडीआर निर्माण झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील दोन वर्षामध्ये महापालिकेच्या हद्दीमध्ये बांधकाम व्यावसायाला चांगले दिवस आले आहेत. समाविष्ट गावांमध्ये विकासाला चांगली चालना मिळाली आहे. यामुळे टीडीआरची मागणी वाढत आहे. टीडीआरच्या माध्यमातून आरक्षणे ताब्यात आल्यास नागरी सुविधा गतीने करता येतात. आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी पैशांची उपलब्धता कमी असल्याने रस्ते, उद्याने, मैदाने अशा सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासन भूसंपादनासाठी टीडीआरच्या पर्यायालाच प्राधान्य देते.

 

– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका.
(Prashant Waghmare, City Engineer, Pune Municipal Corporation)

 

 

Web Title :- Pune PMC News – TDR | Pune Municipal Corporation: Harvest days for TDR as TDR usage is allowed in covered villages

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सायबर पोलिस स्टेशन – फेसबुक फ्रेंडच्या नावाने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दत्तवाडी पोलिस स्टेशन – मित्र पळून गेल्याने टोळक्याने युवकांवर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune News | पुणे न्यूज : संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ फलकाचे उद्घाटन

Pune PMC Employees Transfer | पुणे महानगरपालिका : आठवड्याभरामध्ये 700 बदल्या ! मनपामध्ये अभियंत्यापाठोपाठ अधीक्षक व लिपिकांच्या बदल्या; शिक्षण मंडळाच्या लिपिकांची प्रथमच वॉर्ड ऑफीसमध्ये बदली

 

Related Posts