IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दत्तवाडी पोलिस स्टेशन – मित्र पळून गेल्याने टोळक्याने युवकांवर वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Duttawadi Police Station - Gang tried to kill youths by stabbing them as friends ran away

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मित्राच्या भावाबरोबर झालेल्या भांडणातून टोळके त्याला मारायला आले होते. परंतु, तो पळून
गेल्याने त्यांच्याबरोबरील युवकावर धारदार हत्याराने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) टोळक्याने केला. (Pune Crime
News)

 

याबाबत सक्षम विकास शिंदे (वय १७, रा. वारजे माळवाडी – Warje Malwadi) याने दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमन झारेकर, समीर हातांगळे, अभिजित पाटील, प्रमोद कळंबे, आदित्य खरात व त्यांच्या साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) सं. नं. १३२ येथे रविवारी रात्री दहा वाजता घडला. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र आदेश म्हस्के हे दोघे फिर्यादीच्या दुचाकीचे पंक्चर काढण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे आरोपी तेथे आले. आदेश म्हस्के याच्या भावासोबत आरोपींची भांडणे झाली होती. त्या कारणावरुन त्यांनी आदेश व फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ते पाहून आदेश पळून गेला. दुचाकी हातात असल्याने फिर्यादी त्यांच्या  तावडीत सापडला. त्यांनी आदेश तुझ्यामुळे पळून गेला असे बोलून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार पाहून अनेक लोक जमले. जमलेल्या लोकांमधून फिर्यादी याच्या मदतीला कोणी आले तर त्यांचाही मुडदा पाडू, अशी धमकी देऊन त्यांनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे (API Dongre) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Duttawadi Police Station – Gang tried to kill youths by stabbing them as friends ran away

 

हे देखील वाचा :

Pune News | पुणे न्यूज : संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ फलकाचे उद्घाटन

Pune PMC Employees Transfer | पुणे महानगरपालिका : आठवड्याभरामध्ये 700 बदल्या ! मनपामध्ये अभियंत्यापाठोपाठ अधीक्षक व लिपिकांच्या बदल्या; शिक्षण मंडळाच्या लिपिकांची प्रथमच वॉर्ड ऑफीसमध्ये बदली

Nana Patole | सत्तेसाठी काही पण करण्याची सत्तापिपासू व्यवस्था भाजपने निर्माण केली, नाना पटोलेंचे टीकास्त्र

 

Related Posts