IMPIMP

Pune Police News | केवळ रिबीन आणि आरशावरील रेडियमवरुन आरोपीचा शोध, क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस हवालदाराचा ग्रामस्थांकडून सत्कार

by nagesh
Pune Police News | Villagers hail police constable who investigates complicated crime, finds accused only from ribbon and radium on mirror

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात टेम्पोच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात केवळ वाहनाच्या मागे असलेली रिबीन आणि आरशावरील रेडीयम एवढाच पुरावा पोलिसांकडे (Pune Police News) होता. या क्लिष्ट गुन्ह्याचा योग्यरित्या तपास करुन आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणणारे पोलीस हवालदार दिनेश शांताराम रासकर (Police Constable Dinesh Shantaram Raskar) यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ही घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत 22 एप्रिल रोजी कात्रज कोंढवा रोडवर घडली होती.

पोलीस हवालदार दिनेश रासरक यांचा सत्कार कोंढवा पोलीस ठाण्याचे (Pune Police News) पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Police Inspector Santosh Sonwane) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद कायदेशीर सल्लागार अॅड. वैभव रामदास धायगुडे पाटील (Adv. Vaibhav Ramdas Dhaygude Patil) उपस्थित होते.

गणेश तुळशीराम काळभोर Ganesh Tulshiram Kalbhor (वय 45) हे त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात असताना कोंढवा कात्रज रोडवरील मोहन मार्बल्स समोर भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गणेश काळभोर यांचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दिनेश रासकर यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना रासकर यांनी परिसरातील 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसेच परिसरातील अनेक ट्रान्सपोर्ट कार्यालयात जाऊन चौकशी केली.

सीसीटीव्हीमध्ये संशयित टेम्पे दिसत होता मात्र त्याचा नंबर दिसत नव्हता.
रासकर यांनी सीसीटीव्हीचे बारकाईने निरीक्षण केले असता संशयित टेम्पोच्या मागे रिबीन होती.
तसेच टेम्पोच्या आरशावर रेडियम लावण्यात आले होते.
यावरुन रसारकर यांनी टेम्पोचा माग काढला.
आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे समजताच रासकर यांनी आरोपीला नगर जिल्ह्यातून अटक (Arrest) केली.
तसेच गुन्ह्यातील टेम्पो जप्त केला.
कोणताही ठोस पुरावा नसताना रासकर यांनी गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकीस आणला.
याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे
यांच्या हस्ते रासकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title : Pune Police News | Villagers hail police constable who investigates complicated crime,
finds accused only from ribbon and radium on mirror

Related Posts