IMPIMP

Pune Police Inspector, 3 PSI Suspended | मोक्का कारवाई बाबत संदिग्ध व अत्यंत मोघम अहवाल देवून वरिष्ठांची दिशाभूल, तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Pune Police Inspector, 3 PSI Suspended | Misleading seniors by giving dubious and highly misleading reports regarding MCOCA Action

पुणे (नितीन पाटील) : Pune Police Inspector, 3 PSI Suspended | पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी कामामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या तसेच कर्तव्य न पार पाडणार्‍यां पोलिसांना चांगलाच दणका दिला आहे. पोलिस आयुक्तांनी सहकारनगर पोलिस ठाण्यातील (Sahakar Nagar Police Station) तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांना निलंबीत करून काही तास झाले असतानाच आता पुन्हा आयुक्तांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील (Warje Malwadi Police Station) तत्कलीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांना निलंबीत केले आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Police Inspector, 3 PSI Suspended). मोक्का कारवाई बाबत संदिग्ध व अत्यंत मोघम अहवाल देवून वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगड सायप्पा हाके / डीएस हाके (Sr PI D.S. Hake), पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे / डीजी बागवे (PI Dattaram Bagwe(, पोलिस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल (PSI Manoj Bagal), पोलिस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे (PSI Yashwant Padwale), पोलिस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर (PSI (Janardan Holkar), पोलिस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे यांना निलंबीत करण्यात आले आहे. (Pune Police Inspector, 3 PSI Suspended)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डीएस हाके आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे हे वारजे माळवाडी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते तर इतर बाकीचे सर्वजण वारजे माळवाडी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. त्यांना वारजे माळवाडी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्य बजाविताना हालगर्जीपणा केल्यामुळे आणि जबाबदारी पार न पाडल्यामुळे निलंबीत करण्यात आले आहे.

 

Web Title : Pune Police Inspector, 3 PSI Suspended | Misleading seniors by giving dubious and highly misleading reports regarding MCOCA Action

Related Posts