IMPIMP

RBI Monetary Policy | सध्यातरी कमी होणार नाही तुमचा EMI, एफडीवर मिळत राहील जास्त व्याज, विक्रमी 8 व्या वेळी रेपो रेट स्थिर

by sachinsitapure

नवी दिल्ली : RBI Monetary Policy | आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या बजेटपूर्वी आरबीआयची बहुप्रतिक्षित आर्थिक धोरण समिती बैठक आज समाप्त झाली. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी बैठक समाप्त झाल्यानंतर सांगितले की, समितीने पुन्हा एकदा मुख्य धोरणात्मक दर म्हणजे रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेपो रेट १६ महिन्यांपासून एकाच स्तरावर

याचा अर्थ रेपो रेट आताही ६.५ टक्केवर स्थिर राहणार आहे. ही रिझव्र्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची लागोपाठ ८वी बैठक आहे, ज्यामध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सेंट्रल बँकेच्या एमपीसीने शेवटच्या वेळी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये बदल केला होता आणि तेव्हा तो बदलून ६.५ टक्के केला होता. म्हणजे १६ महिन्यापासून रेपो रेट एकाच स्तरावर कायम आहे.

सध्या मिळणार नाही स्वस्त कर्जाचा लाभ

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या घोषणेने ते लोक नाराज झाले आहेत, जे व्याजदर कमी होण्याची वाट पहात होते. रेपो रेटमध्ये बदल न झाल्यामुळे लोकांवरील ईएमआयचा भार कमी झालेला नाही.

तर दुसरीकडे ही घोषणा अशा गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी आहे, जे एफडीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. जास्त रेपो रेट कायम राहण्याचा अर्थ असा आहे की एफडीवर अजूनही जास्त व्याजाचा लाभ मिळत राहील.

Related Posts