IMPIMP

RBI News | RBI ने रद्द केला ‘या’ बँकेचा परवाना, जर तुमचे सुद्धा पैसे असतील, तर काय होणार? जाणून घ्या सविस्तर

by sachinsitapure

नवी दिल्ली : RBI News | भारतीय रिझव्र्ह बँक (RBI) ने बनारस मर्कंटाईल सहकारी बँक, वाराणसी (Banaras Mercantile Cooperative Bank, Varanasi) ची आर्थिक स्थिती बिघडल्याने बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने परवाना रद्द करताना म्हटले की, परिणामी, बँक चार जुलै, २०२४ ला कामाकाजाच्या वेळेनंतर बँकिंग व्यवहार बंद करेल.

उत्तर प्रदेशचे सहकार आयुक्त आणि सहकार समित्यांच्या निबंधकांना सुद्धा बँक बंद करणे आणि एक लिक्विडेटर नियुक्त करण्याचे आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे. केंद्रीय बँकेने म्हटले की, बँकेने सादर केलेल्या आकड्यांनुसार, ९९.९८ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेव विमा आणि क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) कडून आपली पूर्ण ठेव प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

लिक्विडेशन झाल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसीकडून आपल्या ठेवीच्या रक्कमेवर पाच लाख रुपयांपर्यंत ठेव विमा दावा रक्कम मिळवण्याचा अधिकार असेल. आरबीआयने म्हटले की, सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाची शक्यता नाही तसेच ती सुरू राहणे ठेवीदारांच्या हिताचे नाही.

रिझव्र्ह बँकेने म्हटले, आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे बँक आपल्या ठेवीदारांना पूर्ण देय रक्कम देण्यास असमर्थ ठरेल. डीआयसीजीसीने ३० एप्रिलपर्यंत बँकेशी संबंधित ठेवीदारांकडून प्राप्त इच्छेच्या आधारावर डीआयसीजीसी कायद्याच्या तरतुदींनुसार एकुण विमित ठेव रक्कमेपैकी ४.२५ कोटी रुपयांचे पेमेंट आधीच केले आहे.

Related Posts