IMPIMP

‘कनेक्शन तोडू नका; तोडलेले जोडा’ असे कुठे आदेशात सांगितले आहे? अधिकाऱ्याच्या उत्तराने शेतकरी निराश

by amol
Power Tariff Hike | power tarrif hike india to import over 7 crore tonn coal

लातूर : सरकारसत्ता ऑनलाइन – Electricity Connection | विधिमंडळात मंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा शासन आदेश मानला जातो. पण या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना ती शब्दश: घेतल्यास काय होते, याची प्रचिती एका वायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील वीजपुरवठा तोडलेले शेतकरी महावितरणच्या कार्यालयात वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी घेऊन गेले होते. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्याने कारण दिलं की, कनेक्शन तोडू नका असं सांगितलं आहे, तोडलेले जोडा असं आदेशात कुठेही म्हटलेलं नाही, असे उत्तर दिल्यामुळे शेतकरी निराश होऊन घरी परतले.

चार दिवसांपूर्वी राज्याच्या विधिमंडळात वीजबिलाबाबत मोठा गदारोळ झाला होता. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजबिलाबाबत महत्त्वाची घोषणा केली. जोपर्यंत वीजबिलाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही असे जाहीर केले. या निर्णयाची जोरदार चर्चासुद्धा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. यामुळे किल्लारी आणि आजूबाजूच्या गावातील शेतकरी किल्लारी इथल्या महावितरणच्या कार्यालयात गेले. या शेतकऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी आमचा वीजपुरवठा खंडित झाला आहे तो जोडून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावर अधिकाऱ्यांकडून ‘कनेक्शन तोडू नका असं सांगितलं आहे. तोडलेले जोडा असे कुठे आदेशात सांगितले आहे?’ वीजबिलाचा निर्णय होईपर्यंत नवीन कनेक्शनही (Electricity Connection) देणार नाहीत. असे उत्तर देण्यात आले.

या भागातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पार त्रस्त झाला आहे. त्यामुळे त्यांना बिल भरता आलं नाही.
आता कुठे शेतमाल हातात पडणार आहे, पण त्याला पाणी देण्यासाठी शेतात वीज नाही.
त्यामध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे आपला वीजपुरवठा पूर्ववत होईल अशी आशा घेऊन शेतकरी महावितरणच्या कार्यालयात गेले होते,
पण तेथील अधिकाऱ्यांनी सरकारी भाषेतील अर्थ समजावून सांगितला.
त्यानंतर मात्र शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने माघारी जावे लागले.
मात्र, शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलेल्या आदेशाच्या मागील भावना ना सत्ताधाऱ्यांना कळली ना अधिकाऱ्याला.
ज्या दिवशी महावितरणच्या अधिकाऱ्याला ‘बिटविन द लाइन’ कळेल तो दिवस शेतकऱ्याच्या जीवनात नक्कीच प्रकाश आणणारा ठरेल.

Pandharpur News : अवैध सावकारी प्रकरणी भाजप नेत्याच्या घरावर पोलिसांचा छापा

Related Posts