IMPIMP

Sambhaji Bhide | संभाजी भिडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘…तर मी मंत्रीपदावर थुंकतो, असं म्हणून एकही मंत्री बाहेर पडला नाही’

by nagesh
Sambhaji Bhide | 'Hindustan has got' Gandhi Badha 'worse than poisoning, ghost badha' - Sambhaji Bhide

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Sambhaji Bhide | राज्य सरकारने दोन दिवसांपुर्वी राज्यात सुपर मार्केटमध्ये देखील वाईनची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या अनेक नेत्यांनी या निर्णावरून ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. यानंतर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी देखील या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. यावेळी भिडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) कारभार लाल बहादूर शास्त्रीसारखा आहे, असं म्हणत मोदींचं कोतुक केलं आहे. त्यावेळी ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले, “जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा एकसुद्धा मंत्री, आमदार ‘असा निर्णय करणार असेल तर मी आमदारकीवर, मंत्रीपदावर थुंकतो, तुमच्यात बसण्याचं पाप मी करणार नाही’, असं म्हणून बाहेर पडला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धान्य कुजवून त्याच्यापासून दारू तयार करा असं सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात. आम्हाला राग येत नाही, संताप येत नाही.”

 

पुढे बोलताना संभाजी भिडे म्हणाले, “समाज काही ऐकत नाही, लोक काही सुधारत नाहीत, लोक काही प्रतिसाद देत नाहीत असं बोलायचं नाही. समाजाला आपण दिशा द्यायची असते. आपण जगून दाखवायचं असतं. ज्या लोकशाही नियुक्त राज्यकर्त्यांवर पुढच्या पिढ्यांना प्रकाश दाखवण्याची जबाबदारी आहे, त्यांनी असा बेशरम, राष्ट्रघातक, धर्मघातक, नीतीघातक, सर्वनाशक निर्णय घेऊन मोठं पाप केलं आहे. त्यांनी त्यांचं कुळ आणि जन्म घेतलेल्या आई-बापाची कूस बाटवलेली आहे. हे थांबलंच पाहिजे,” असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केलीय.

यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दारूबंदी करावी, अशी मागणी केलीय.
“मी कोश्यारींना म्हणणार आहे की हे मंत्रिमंडळ बरखास्त करून टाका.
तुमचा अधिकार आहे तो. मोदी सरकार खरोखर भगवंताची कृपा म्हणून मिळालं आहे आपल्याला.
अतुलनीय. लालबहादूर शास्त्री जसे चांगले होते, तसेच हे आहेत. मी पंतप्रधानांचं मन जाणतो.
त्यांनी खरोखर या देशातल्या दारूला कायमची तिलांजली देणारा ठराव लोकसभेत करून घटनेत दुरुस्ती करावी.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, ”एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने, एक पाऊल प्रगतीच्या दिशेने.. पण हे पहिलं पाऊल सर्वनाशाच्या दिशेने पडलेलं आहे.
या देशातली दारू संपली पाहिजे 100 टक्के. आपण दारूचा जर अशा पद्धतीने मुक्तसंचार होऊ देत असू, तर गांजाची शेती करण्याला आपण का आडवं जायचं?”
असं ते म्हणाले. तसेच भिडे यांनी त्यावेळी दिवंगत आर. आर. पाटील (आबा) यांची आठवण काढली. ”मला आठवण होते आर. आर. आबांची. डान्सबारचा मुद्दा होता.
त्यांनी मंत्रीमंडळात सगळ्यांच्या विरोधात जाऊन डान्सबार बंदी केली. आज आर आर आबा असते, तर सगळ्यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय होऊ दिला नसता.
यातून नेमकं काय साधायचंय ते नेमकं कळत नाहीये. असे निर्णय झाल्यानंतर कुणाला राग येत नाहीये.”

 

Web Title :- Sambhaji Bhide | sambhaji bhide targets maharashtra uddhav thackeray government on wine sell decision

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दोन वर्षापासून फरार असलेल्या पिंटू मारणे टोळीचा मुख्य सुत्रधार गुन्हे शाखेकडून गजाआड

Pimpri Corona Updates | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 5181 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona Updates | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 8200 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, 6 जणांना पोलीस कोठडी

 

Related Posts