IMPIMP

Sardar Patil-SDCC Bank | भाजपचा प्रचार केला म्हणून जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा देण्याचा आदेश

by sachinsitapure

सांगली: Sardar Patil-SDCC Bank | लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार केल्यामुळे जतचे सरदार पाटील (Sardar Patil) यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा देण्याचा आदेश काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत (MLA Vikram Sawant) यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांचा प्रचार केला नाही म्हणून राजीनामा मागितला असता तर उचित ठरले असते असे म्हणत आपण गुरुवारी राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील हे भाजपचे माजी जिल्हापरिषद सदस्य होते. त्यांनी भाजपमधून (BJP) काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील (MP Vishal Patil) यांचा प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, पाटील यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांचा उघड प्रचार केला.

यामुळे त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा असे आदेश आ. सावंत यांनी दिले आहेत. दरम्यान, श्री. पाटील यांनी राजीनामा उद्या (गुरुवारी) देत असल्याचे सांगत ज्या कारणासाठी राजीनामा देण्यास सांगितले ते कारण संयुक्तिक वाटत नाही असे म्हंटले आहे.

Related Posts