IMPIMP

SBI Online Quick Loan | हे काय? 15 मिनिटात कर्ज मंजूर आणि खात्यात येतील पैसे, एसबीआयने आता कोणती सुविधा सुरू केलीय जाणून घ्या…

by sachinsitapure

नवी दिल्ली : SBI Online Quick Loan | जर तुमचे एसबीआयमध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. होय, एसबीआयने छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी वेब-बेस्‍ड डिजिटल बिझनेस लोन सोल्‍यूशन लाँचे केले आहे. ही ‘एमएसएमई सहज – एंड टू एंड डिजिटल इनव्हॉईस फायनान्सिंग’ नावाची सुविधा आहे. तिचा हेतु एमएसएमईला कमीत कमी वेळात कर्ज देण्याचा आहे.

बँकेचा दावा आहे की, या प्रक्रियेत कर्जासाठी अर्ज करणे, पेपर जमा करणे आणि कर्जाची रक्कम मिळण्यापर्यंतचे काम १५ मिनिटाच्या आत पुर्ण होईल. इतकेच नव्हे तर यामध्ये कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही.

कर्जाचा हप्ता देखील स्वयंचलित पद्धतीने

बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात दावा केला आहे की, कर्जाचा हप्ता सुद्धा ठरलेल्या तारखेला स्वयंचलित पद्धतीने भरला जातो. म्हणजे सिस्टम पूर्ण प्रोसेस स्वताच पूर्ण करते. बँकेचे म्हणणे आहे की, ‘एमएसएमई सहज’ चा वापर करून ग्राहक १५ मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळेत आपल्या जीएसटी रजिस्टर सेल्स इनव्हॉईसच्या आधारावर १ लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळवू शकतो. एमएसएमई सहज हे छोट्या उद्योजकांना व्यवसाय चालवण्यासाठी लवकर पैसा पुरवण्यासाठी उपलब्ध केले आहे.

बँकेने म्हटले आहे की, हे अशा छोट्या उद्योजकांसाठी बनवले आहे, जे जीएसटीच्या कक्षेत येतात. सध्याच्या ग्राहकांना ही सुविधा योनो अ‍ॅपवर ऑनलाईन मिळेल. ही सुविधा त्या छोट्या व्यावसायकांसाठी सुद्धा आहे जे आधीपासून एसबीआयचे ग्राहक नाहीत, परंतु त्यांचे बँकेत करंट अकाउंट आहे. या सुविधेचा लाभ देशातील कोट्यवधी व्यावसायिक नियम आणि अटी पूर्ण करून घेऊ शकतात.

Related Posts