IMPIMP

Sharad Pawar On Maharashtra Budget 2024 | अर्थसंकल्पावरून शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘खिशात ७० रुपये असताना…’

by sachinsitapure

कोल्हापूर : Sharad Pawar On Maharashtra Budget 2024 | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरु आहे. पुढच्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत त्यामुळे हे शेवटचे अधिवेशन आहे. काल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ अशा शब्दात राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टीका केली होती तर अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचं आवतन, नुसती आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर खोट्या अफवा पसरवून लोकसभेमध्ये काही जागा मिळवल्याने विरोधकांना थोडा उत्साह आला होता. मात्र या अर्थसंकल्पाने त्यांचा हा उत्साह ही संपला आहे असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) लगावला आहे.

त्यांनतर आता शरद पवारांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे . शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, ” साधी गोष्ट आहे मी एखाद्या गोष्टीला १०० रुपये खर्च करणार म्हणालो आणि माझ्या खिशात ७० रुपये आहेत तर मग १०० रुपये कसे खर्च करणार? असा खोचक टोला पवारांनी लगावला आहे. पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसूल किती जमा आहे? दुसरं असे की किती महसूल खर्च होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम जास्त असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतूद न करता खर्च करणार म्हंटलं आणि विचारपूर्वक केलं असं म्हंटलं तरी फारसा काही अर्थ लागत नाही असे शरद पवार म्हणाले.

Related Posts