IMPIMP

Sharad Pawar Satana Sabha | वादळीवारा आणि पावसातही शरद पवारांचे भाषण सुरूच, व्यासपीठावरील डिजिटल बॅनर कोसळला, सुदैवाने हानी टळली (Video)

by sachinsitapure

नाशिक : Sharad Pawar Satana Sabha | आज सटाणा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) डॉ. शोभाताई बच्छाव (Dr. Shobha Bachhav) यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा सुरू होती. अचानक वादळीवारा आणि पाऊस सुरू झाला. परंतु, शरद पवारांनी आपले भाषण न थांबवता सुरूच ठेवले. त्याचवेळी व्यासपीठावरील डिजिटल बॅनर कोसळल्याची (Digital Banner Collapse) घटना घडली. सुदैवाने कोणतीही हानी यावेळी झाली नाही.

सटाण्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना वादळी वारा सुटला, या वाऱ्यामुळे सभेच्या व्यासपीठावरील डिजिटल बॅनर कोसळत होता, उपस्थित लोकांनी तो सावरला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. बॅनर कोसळल्याचे शरद पवारांनी भाषण उरकते घेतले.

या सभेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, देशात सध्या मोदी राज्य आहे. विविध जिल्ह्यात आज कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे. मात्र, कांद्याची निर्यात केंद्र सरकारने बंद केली आहे. आमचे राज्य होते तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून आले होते, शरद पवार होश मे आवो अशा घोषणा दिल्या. त्यावेळी, मी दिल्लीत गेलो आणि कांदा निर्यातबंदी उठवली होती.

शरद पवार म्हणाले, आताच्या सरकारला (Modi Govt) त्याची चिंता नाही. कांद्याला भाव नाही, द्राक्षाला भाव नाही, द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. मात्र, मोदी (PM Narendra Modi) म्हणतात द्राक्ष व डाळिंबाला भाव दिले, पंतप्रधान खोटे बोलतात आणि आमच्यावर टीका करत आहेत.

शरद पवार पुढे म्हणाले, धान्य मोफत देण्याच्या घोषणा करतात आणि शेतकऱ्यांच्या साहित्याची किंमत वाढवली जाते. हा देश धान्य निर्यात करणारा होता, आज आयात करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही फुकट धान्य देतो अशा गप्पा मारू नका.

शेतकऱ्याच्या घामाने देशातील धान्याचे गोडवून भरले म्हणून तुम्ही मोफत वाटत आहात. शेतकऱ्यांचे जीवन समृध्द कसे होईल ते बघा. केवळ आमच्यावर टीका करण्यात ते धन्यता मानतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हटले होते, काय झाले. दोन कोटी नोकऱ्या देणार होते, काय झाले, असे प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केले.

शरद पवार म्हणाले, सत्तेत बसण्याचा अधिकार तुम्हाला, नाही देश संकटातून जातो आहे. देशाचा इतिहास तपासून बघा. यशवंतराव चव्हाण यांनी मिग विमानाचा कारखाना नाशकात उभारला. गांधीच्या विचाराने हा देश चालला पाहिजे. इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने देश चालला पाहिजे, पण मोदी तसे करणार नाहीत.

चीन आपल्या देशात घुसतोय त्याकडे त्यांचे लक्ष नाही. देशाचे रक्षण करायला ठोस पाऊले उचलणे गरजचे आहे, पण मोदी ते करत नाहीत. म्हणून या निवडणुकीत भाजपचा पराभव करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

Sharad Pawar Slams Praful Patel | शिवरायांचा जिरेटोप घालून मोदींचा सत्कार, शरद पवारांनी प्रफुल पटेलांना फटकारले, लाचारी करावी, पण त्यालाही मर्यादा असते

Related Posts