IMPIMP

Sharad Pawar Vs Ajit Pawar | बालेकिल्यातच अजित पवारांना आणखी एक हादरा; आणखी एक कट्टर समर्थक शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत?

by sachinsitapure

चिंचवड: Sharad Pawar Vs Ajit Pawar | पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांचे कट्टर समर्थक त्यांची साथ सोडणार आहेत. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातून अजित पवारांना एकामागून एक हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांचे कट्टर समर्थक ज्यांनी चिंचवडची (Chinchwad Assembly) पोटनिवडणूक लढवली होती ते नाना काटे (Nana Kate) हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी (Ajit Gavhane) माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवारांनी सर्वांसाठी दारं खुली ठेवल्याचे जाहीर केले होते. आता याच दारातून नाना काटे ही घरवापसी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत माध्यमांनी नाना काटे यांना तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार का ? असे विचारले असता मी चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचे म्हणत त्यांनी संभ्रावस्था वाढवली आहे.

माध्यमांशी बोलताना नाना काटे म्हणाले, ” आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमची ताकद आहे. जरी महायुतीचे तिकीट भाजपला गेले तरी मी ही निवडणूक लढवणार आहे. मी विधानसभेच्या अनुषंगाने अजितदादांची भेट घेतली होती. विधानसभेत आम्ही तयारीला लागलो आहे. अजित पवारांनी मला तू तुझ्या पद्धतीने काम सुरू ठेव असे म्हणत संकेत दिले आहेत. जे काही असेल ते पुढे पाहू, असे दादा म्हणाले. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे त्या-त्या वेळी निर्णय घेतले जातील. निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे. चिन्ह काय असेल ते त्यावेळची परिस्थिती जशी असेल तसे मी ठरवणार आहे असे काटे यांनी सांगितले.

जर शरद पवारांनी तिकीट दिले तर निवडणूक लढणार का? यावर बोलताना काटे म्हणाले, ” सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाईल याविषयी कोणतीही निश्चितता नाही. कारण भाजपमध्ये इच्छुक उमेदवार जास्त आहेत. जगताप यांच्याकडे देखील दोन उमेदवार आहेत. त्यामुळे या वादामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेच वक्तव्य करणे योग्य निर्णय ठरणार नाही, असे काटे म्हणाले.

Related Posts