IMPIMP

Shikrapur Police News | साहेब तुम्ही माझ्यासाठी वर्दीतील ‘विठ्ठल’ बनून देवासारखे आलात धावून; प्रवासातील गरोदर महिलेसाठी पोलीस बनले ‘देवदूत’, शिक्रापूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

by sachinsitapure

शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Shikrapur Police News | अनेक वेळा पोलिसांना खाकी वर्दीतील “देव” असे म्हटले जाते अश्याच एका घटनेतून पुन्हा एकदा त्याची प्रचीती आल्याचे दिसून येते आहे.पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर मध्ये प्रवासातील गरोदर महिलेसाठी पोलीस देवदूत बनल्याचे दिसून आले.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशवा वाबळे व पोलीस हवालदार आत्माराम तळोले हे दोघे रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास रात्रगस्त करत असताना पुणे नगर महामार्गावरील मलठण फाटा येथे एक बस थांबलेली आणि नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसल्याने पोलीस बसजवळ आले , यावेळी पुण्याहून आई व सासू सोबत बुलढाणा येथे चाललेल्या अस्मिता दांडगे या गरोदर महिलेचे पोट दुखू लागल्याचे समजले, यावेळी तात्काळ पोलीस हवालदार आत्माराम तळोले यांनी काही रुग्णवाहिकांना फोन केला, मात्र तो पर्यंत महिलेच्या वेदना वाढू लागल्याने ती मोठ्याने रडू लागली. यावेळी पोलिस हवालदार तळोले यांनी महिलेच्या आई व सासूची परवानगी घेत अस्मिताला विशिष्ट पद्धतीने झोपण्यास सांगितले असता काही क्षणात अस्मिताने गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु कोणीही महिला मदतीसाठी जवळ येईना,

या घटनेनंतर अस्मिताच्या आई व सासूने पोलिसांना हात जोडले काही वेळात रुग्णवाहिका आल्याने पोलिसांनी अस्मिताला बाळासह उपचारासाठी रुग्णालयात नेले, यावेळी अस्मिताने मोठ्या आनंदाने पतीला फोन करत आपल्याला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी देत पोलिसांचे आभार मानत, “साहेब तुम्ही माझ्यासाठी वर्दीतील विठ्ठल बनून देवासारखे धावून आल्याची भावना व्यक्त केली, त्यांनतर काही वेळ पोलिसांनी पुन्हा रुग्णालयात थांबून सदर महिलेला पुन्हा प्रवासासाठी बसवून देऊन त्यांचा आनंदाने निरोप घेतला. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक केशवा वाबळे व पोलीस हवालदार आत्माराम तळोले यांचे अनेकांनी कौतुक केले.

Related Posts