IMPIMP

Shivsena UBT – Hasan Mushrif | शिवसेना ठाकरे गटाकडून पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या राजीनाम्याची मागणी

by sachinsitapure

कोल्हापूर: Shivsena UBT – Hasan Mushrif | | कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांवरून आणि समस्यांवरून मंगळवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी निशाणा साधला. विविध विकास काम अपूर्ण असताना केवळ विकासाच्या गप्पा ठोकणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी १०० कोटी रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा यांच्या अपूर्ण कामांबद्दल जवाब द्या, अन्यथा राजीनामा द्या. अशी थेट मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी पत्रकार परिषदेत केली.

या संदर्भात उत्तर न मिळाल्यास ६ जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा इशाराही शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी दिला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना, नेहमीप्रमाणेच कोल्हापूरला प्रत्येक निर्णयाची प्रयोगशाळा समजून कोल्हापूरवर निव्वळ निधीच्या घोषणांची खैरातींची सवय लावली आहे.

प्रत्यक्षात एकही काम न करता सर्वच नेते अकार्यक्षम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या कोल्हापुरातील अकार्यक्षम पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये मुश्रीफ यांचा देखील समावेश करावा का? असा प्रश्न संजय पवार यांनी केला आहे. १०० कोटी रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. टक्केवारीसाठी काम रखडले काय? असा रोखठोक सवाल करत महापालिकेच्या प्रशासनाला धारेवर धरत मोठ्या गाजावाजाने शुभारंभ तुम्ही कोल्हापूरच्या शंभर कोटी रुपयांच्या रस्ते योजनेचा केला. पण आज अखेर पावसाळ्याानंतर करण्यात येईल, असे जुजबी उत्तर शहर अभियंत्यांनी दिले.

खरंतर आज १६ रस्त्यांवर खर्च होणारा हा निधी अमृत योजना गॅस पाईपलाईन व इतर गोष्टीमुळे उखडलेले रस्ते निव्वळ या कंत्राटदाराच्या व महापालिका प्रशासनाच्या कारभारामुळे हा संपूर्ण पावसाळा जनता या खड्ड्यातून प्रवास करणार याचे आपल्याला सोयरंसुतक नाही का? याला जबाबदार कोण याचे उत्तर पालकमंत्री मुश्रीफ यांनी द्यावे, असा सवाल ही संजय पवार यांनी केला. ६ जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली तर या बैठकीत घुसण्याचा इशाराही संजय पवार यांनी दिला आहे.

Related Posts