IMPIMP

Small Savings Schemes | सुकन्या समृद्धी आणि PPF सह अल्पबचत योजनांबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या जुलै ते सप्टेंबरपर्यंत किती मिळेल व्याज

by sachinsitapure

नवी दिल्ली : Small Savings Schemes | सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund), किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme), राष्ट्रीय बचत पत्रासह NSC (National Savings Certificate) विविध बचत योजनांबाबत मोठी अपडेट आली आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निधी (PPF) आणि इतर अल्पबचत योजनांवर चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सरकारने व्याजदारांबाबत ही घोषणा केली आहे.

१ जुलै, २०२४ पासू सुरू होत असलेल्या तिमाहीसाठी विविध अल्पबचत योजनांवर व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाही (१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत) साठी विविध अल्पबचत योजनांवर व्याजदर पहिली तिमाही (१ मार्च ते ३० जून २०२४ पर्यंत) साठी अधिसूचित दरांच्या समान राहतील.

अधिसूचनेनुसार, सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत जमा रक्कमेवर ८.२ टक्के व्याजदर मिळेल, तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर व्याजदर ७.१ टक्के राहील. पीपीएफ आणि पोस्ट बचत ठेव योजनेचे व्याजदर सुद्धा अनुक्रमे ७.१ टक्के आणि चार टक्केवर कायम राहतील.

किसान विकास पत्र, एनएससीवर किती व्याज

किसान विकास पत्रावर व्याजदर ७.५ टक्के असते तसेच ही गुंतवणूक ११५ महिन्यात परिपक्व होईल. जुलै-सप्टेंबर २०२४ च्या कालावधीसाठी राष्ट्रीय बचत पत्रावर व्याजदर ७.७ टक्के राहील. सप्टेंबर तिमाहीत सुद्धा पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेच्या गुंतवणुकदारांना पहिल्या प्रमाणेच ७.४ टक्के व्याज देईल. सरकार प्रत्येक तिमाहीत पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे अल्प बचत योजांसाठी व्याजदर अधिसूचित करते.

Related Posts