IMPIMP

Sushant Singh Rajput | दुर्देवी ! सुशांत सिंह राजपूतच्या 4 नातेवाईकांचा कार अपघातात मृत्यू

by nagesh
Sushant Singh Rajput | sushant singh rajputs family mourns again 4 relatives die in car accident

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sushant Singh Rajput | बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बिहारमधील (Bihar) लखीसराय (Lakhisarai) जिल्ह्यात मंगळवारी सकाळी जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस स्टेशन हद्दीतील भंडारा गावातील एका कुटुंबातील सहा जणांचा अपघाती मृत्यू झाला. या सहा जणांपैकी 4 जण सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक होते. या अपघातात सुशांत राजपूतचा भावोजी आणि हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश सिंग (Haryana cadre IPS officer Om Prakash Singh) यांचे चार नातेवाईक ठार झाले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

ओमप्रकाश सिंह यांच्या बहिणीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर सुशांतच्या (Sushant Singh Rajput ) बहिणीचा पती आणि त्यांची दोन मुले आणि मुलीसह एकूण १० लोक सुमो व्हिक्टामधून पाटणाहून त्यांच्या घरी परतत होते. यावेळी लखीसरायजवळ त्यांच्या कारला अपघात (Accident) झाला आणि त्यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांना जमुईला तर दोन जणांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलीस स्टेशन अंतर्गत शेखपुरा रोड येथील पिपराजवळ ही दुर्घटना घडली आहे.

या अपघातात सुमो विक्टा आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हि अपघात एवढा भयंकर होता कि यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये लालजीत सिंग, नेमानी सिंग, रामचंद्र सिंग, बेबी सिंग, अनिता सिंग आणि प्रीतम सिंग यांचा समावेश आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक हे खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून ते सर्व आपापसात नातेवाईक आहेत.बालमुकुंद सिंग,दिलखुश सिंग,बाल्मिकी सिंग आणि टोनू सिंग अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात आली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Sushant Singh Rajput | sushant singh rajputs family mourns again 4 relatives die in car accident

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Foundation | पुनित बालन ग्रुप, विस्डम क्रिकेट अकादमी संघांची विजयी घौडदौड कायम !

Pune-Pimpri-Baramati Rickshaw Fare Hike | 22 नोव्हेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ ! पहिल्या दीड कि.मी.साठी 21 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 14 रुपये भाडेदर

CBI ची मोठी कारवाई ! इंजिनियर आणि त्याची पत्नी बनवत होते मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ

 

Related Posts