IMPIMP

Team India Champion | T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघावर पैशांचा पाऊस, दक्षिण अफ्रीकेला सुद्धा मिळाले कोट्यवधी रूपये

by sachinsitapure

नवी दिल्ली : Team India Champion | टीम इंडियाने टी२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण अफ्रीकेचा पराभव केला. विजेता बनल्यानंतर भारतीय टीमला रोख बक्षीस म्हणून (Team India Prize Money) कोट्यवधी रूपये मिळाले. टीम इंडियासोबतच दक्षिण अफ्रीकेला सुद्धा बक्षीसांची रक्कम मिळाली. टी२० विश्वचषक २०२४ च्या विजेत्या संघाला बक्षीस म्हणून सुमारे २० कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच सुपर ८ मध्ये विजयी झालेल्या संघांनाही पैसे मिळाले आहेत.

टी२० विश्वचषक २०२४ च्या फायनलपर्यंत पर्यंत पोहोचलेल्या संघांना भरपूर पैसे मिळाले आहेत. स्पर्धेसाठी एकुण बक्षीसाची रक्कम ११.२५ मिलियन डॉलर ठेवण्यात आली होती. हे सुमारे ९३.५१ कोटी रुपये होतात. टीम इंडिया विजेती ठरली आहे. त्यांना २.४५ मिलियन डॉलर म्हणजे २०.३६ कोटी रुपये मिळाले आहेत. यासोबतच दक्षिण अफ्रीकेला सुद्धा मोठी रक्कम मिळाली आहे. अफ्रीकन टीम फायनल पर्यंत पोहोचल्याने त्यांना १०.६४ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण अफ्रीकेसह दोन अन्य टीम उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले होते. इंग्लंड आणि अफगाणिस्तानला बक्षीस म्हणून ६.५४ कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय अन्य संघांना सुद्धा रोख बक्षीस मिळाले आहे. स्पर्धेची दुसरी फेरी म्हणजे सुपर ८ पर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक टीमला ३.१७ कोटी रुपये मिळाले आहेत.

टी२० विश्व कप २०२४ मध्ये शेवटच्या स्थानावर राहिलेल्या टीमला सुद्धा रोख बक्षीस मिळाले आहे. यामध्ये ९व्या पासून १२व्या स्थानावरील टीमला २.०५ कोटी रुपये मिळाले आहेत. तर १३व्या पासून २०व्या स्थानावरील टीमला १.८७ कोटी रुपये मिळाले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या विजयासाठी २५.८९ लाख रुपये मिळाले आहेत.

टी-२० विश्वचषक २०२४ च्या बक्षिसाची रक्कम

विजेता- २०.३६ कोटी रुपये
उपविजेते – १०.६४ कोटी
उपांत्य फेरीत पराभूत – ६.५५ कोटी रुपये
सुपर ८ संघ – ३.१८ कोटी रुपये
९ ते १२ क्रमांकावर असलेल्या संघांना – २.०६ कोटी रुपये
१३ ते २० क्रमांकावर असलेल्या संघांना – १.८७ कोटी रुपये
प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला बोनस – रु २६ लाख

Related Posts