IMPIMP

Pune Crime News | पुण्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर (Retired ACP) विनयभंगाचा गुन्हा दाखल

by nagesh
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणार्‍या महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना (Maharashtra Police Mega City) संस्थेचे संचालक, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश भामरे (Retired ACP Suresh Bhamre) यांच्यावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

हा प्रकार लोहगाव (Lohegaon) येथील महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेच्या जागेत गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता घडला. याबाबत येरवडा (Yerwada) येथील एका ४४ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४४/२३) दिली आहे. त्यावरुन सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश भामरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचा
प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. संचालक मंडळावर आरोप प्रत्यारोप होत आहेत.
फिर्यादी या बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्या बांधकामाचे शुटिंग करीत होत्या.
तेव्हा भामरे यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. फिर्यादीचा हात पकडून फिर्यादी यांच्या गालाला स्पर्श
करुन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. अश्लिल शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता माळी (PI Sangeeta Mali) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | A case of molestation has been registered against a retired Assistant Commissioner of Police in Pune

Related Posts