IMPIMP

Pune Crime News | 50 लाखाच्या खंडणी प्रकरणी चौघांना अटक ! कंपनी चालकाकडे Whatsapp Call करून केली होती ‘डिमांड’

by nagesh
Pune Crime News | Four people arrested in the case of extortion of 50 lakhs! The company made a ‘demand’ by calling the driver on Whatsapp

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीतील एका कंपनीचालकास Whatsapp Call करून 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी (Extortion Case) तसेच मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांचा अटक केली आहे. त्यापैकी तिघेजण कंपनी चालकाकडे कामाला होत अशी माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

सौरभ संजय बनसोडे Saurabh Sanjay Bansode (21, रा. सर्व्हे नंबर 25/02, पिंगळे गिरणी वस्ती, शिवाजी चौक, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे), पवन मधुकर कांबळे Pawan Madhukar Kamble (22, रा. कांबळे वस्ती, तरडे वस्ती, धायरी, पुणे), संकेत योगेश जाधव Sanket Yogesh Jadhav (24, रा. अल्पहीत बिल्डींग, दुसरा मजला, अभिनव कॉलेजजवळ, आनंद सुपर मार्केट मागे, नर्‍हे, पुणे) आणि कृष्णा भिमराव भाबट Krishna Bhimrao Bhabat (19, रा. बेनकर वस्ती, दुर्वांकुर कॉम्प्लेक्स, धायरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 6 मे 2023 रोजी रात्री 8 वाजण्याच सुमारास फिर्यादी कंपनी चालक हे कात्रज आर्यन स्कुलजवळून जात असताना आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी 50 लाखाची खंडणी उकळण्यासाठी त्यांना अडविले. त्यांना गाडीतुन खाली उतरून त्यामधील एकाने चाकुचा धाक दाखविला. इतरांनी फिर्यादीला मारहाण करून शिवीगाळ केली तसेच लक्षात ठेव अशी धमकी दिली. दरम्यान, दि. 12 मे 2023 रोजी पुन्हा आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून कंपनी चालकाकडे 50 लाखाच्या खंडणीची (Ransom) मागणी केली.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कंपनी चालकाने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासास सुरूवात केली. पोलिस अंमलदार हर्षल शिंदे (Police Harshal Shinde), पोलिस सचिन गाडे (Police Sachin Gade) आणि पोलिस धनाजी धोत्रे (Police Dhanaji Dhotre) यांना आरोपींबाबत गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar), पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik), सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta), पोलिस अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, पोलिस सचिन सरपाले, पोलिस शैलेश साठे, पोलिस चेतन गोरे, पोलिस निलेश ढमढेरे, पोलिस मंगेश पवार, पोलिस अवघुत जमदाडे, पोलिस अभिनय चौधरी, पोलिस निलेश खैरमोडे, पोलिस राहुल तांबे आणि पोलिस विक्रम सावंत यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.

 

आरोपींकडे सखोल तपास केला असता आरोपी सौरभ बनसोडे, पवन कांबळे आणि संकेत योगेश जाधव हे
फिर्यादीच्या कंपनीत काही दिवस कामाला असल्याचे समोर आले. त्यांनी कंपनी चालकाकडे किती रक्कम आहे,
ते दररोज ऑफिसला कोणत्या गाडीतून येतात, कोणत्या मार्गाने जातात याची माहिती घेतली होती.
रेकी करून त्यांना दि. 6 मे 2023 रोजी अडविले आणि खंडणी मागितली तसेच दि. 12 मे 2023 रोजी
व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून 50 लाखाची खंडणी (Demand Of Extortion Via Whatsapp Call) मागितल्याचे समोर
आले. गुन्हयाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत असून आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

Web Title : Pune Crime News | Four people arrested in the case of extortion of 50 lakhs! The company made a
‘demand’ by calling the driver on Whatsapp

Related Posts