IMPIMP

Uric Acid Control Tips | वाढत्या यूरिक अ‍ॅसिडने असाल त्रस्त तर सकाळी रिकाम्या पोटी करा लिंबूचे सेवन, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

by nagesh
Uric Acid Control Tips | how to use lemon to cure uric acid know the lemon benefits also

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Uric Acid Control Tips | खराब जीवनशैली आणि खराब आहार नकळत अनेक आजारांना निमंत्रण देतो. वेळेवर न झोपणे, वेळेवर न उठणे आणि वेळेवर न जेवणे, यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यूरिक अ‍ॅसिड वाढणे ही समस्या देखील खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवते. शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी प्युरिन नावाच्या प्रोटीनच्या जास्त प्रमाणामुळे वाढते. (Uric Acid Control Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधेदुखी, बसण्यास त्रास होणे, बोटांना सूज येणे अशा अनेक प्रकारच्या समस्या शरीरात निर्माण होतात. जसजसे यूरिक अ‍ॅसिड तयार होते, तसतसे या अ‍ॅसिडचे छोटे तुकडे सांधे, स्नायू आणि ऊतींमध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होतात. युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी लिंबाचे सेवन खूप प्रभावी आहे. जर तुमचे युरिक अ‍ॅसिड वाढले असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लिंबू घ्या. (Uric Acid Control Tips)

 

लिंबाचा रस कशाप्रकारे करतो युरिक अ‍ॅसिड नियंत्रित :

लिंबाचा रस यूरिक अ‍ॅसिडची पातळी संतुलित करण्यास मदत करतो, कारण तो शरीराला अधिक अल्कधर्मी बनविण्यास मदत करतो. याचा अर्थ लिंबू रक्त आणि इतर द्रवपदार्थांची पीएच पातळी किंचित वाढवते. लिंबाचा रस देखील यूरीन क्षारयुक्त बनवतो.

 

एका अभ्यासानुसार, असे यामुळे होते कारण लिंबाचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरात कॅल्शियम कार्बोनेट जास्त प्रमाणात बाहेर पडते. कॅल्शियम खनिज यूरिक अ‍ॅसिडसोबत बांधले जाते आणि ते पाणी आणि इतर संयुगामध्ये मोडते. हे रक्ताला कमी आम्लयुक्त बनवते आणि शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करते.

 

युरिक अ‍ॅसिड नियंत्रणासाठी अशाप्रकारे करा लिंबाचा वापर

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी दिवसातून एक ते दोन लिंबाचा रस प्या. लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते इम्युनिटी मजबूत करते, तसेच यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळूनही रिकाम्या पोटी सेवन करू शकता.
रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते प्यायल्याने युरिक अ‍ॅसिड नियंत्रित राहते.
व्हिटॅमिन सी ने युक्त लिंबू पचन व्यवस्थित ठेवते आणि वजनही नियंत्रित ठेवते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid Control Tips | how to use lemon to cure uric acid know the lemon benefits also

 

हे देखील वाचा :

Problem Of White Discharge | व्हाईट डिस्चार्जने त्रस्त असाल तर ‘या’ 5 आयुर्वेदिक उपायांनी करा उपचार

Pre-Diabetes Diet | प्री-डायबिटीज असेल तर आजच ‘या’ 8 फूड्सपासून राहा दूर

Weight Loss Drink | वजन कंट्रोल करते नारळ पाणी, जाणून घ्या आरोग्याला कसा होता फायदा

 

Related Posts