IMPIMP

Uruli Kanchan-Jejuri Road Accident | पुणे : भरधाव कार कठडा तोडून कालव्यात कोसळली, एकाचा मृत्यू, तिघे जखमी (Video)

by sachinsitapure

पुणे :  – Uruli Kanchan-Jejuri Road Accident | उरुळी कांचन जेजुरी रस्त्यावर शिंदवणे गावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून नवीन बेबी कालव्याच्या लोखंडी कठडा तोडून कार पाण्यात कोसळली. यामध्ये एकाचा जागेवर मृत्यू झाला तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.23) सकाळी सहाच्या सुमारास झाला. (Pune Accident News)

अमर साहेबराव घाडगे (वय-28 रा. जुन्नर) या कारचालकाचा मृत्यू झाला आहे. तर गणेश संजय थोरात (वय-22) व शुभम शंकर इंगोले (वय-21 दोघे रा. केसनंद), आदित्य महादेव तावरे (वय-20 रा. जुन्नर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, कारमधील चौघांचा बकऱ्या विकण्याचा व्यवसाय आहे. आज सकाळी फलटण येथील बाजार असल्याने चौघेजण गाडीतून निघाले होते. शिंदवणे गावाच्या हद्दीत असलेल्या कालव्यावर आले असता कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट कालव्याच्या पाण्यात कोसळली. यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

चारचाकी कोसळल्याची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मदत करुन सर्वांना गाडीतून बाहेर काढले. चालक अमर घाडगे याचा जागेवरच मृत्यू झाला. ग्रामस्थ वेळेवर पोहोचले नसते तर इतर तिघांचाही जीव संकटात सापडला असता. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Pune Crime News | पुणे : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत असभ्य वर्तन

Related Posts