IMPIMP

Vekananda Kendra Kanyakumari | ‘धन्यो गृहस्थाश्रमः’ विषयावर २६ मार्च रोजी व्याख्यान ! ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ पुणे शाखेकडून वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन

by nagesh
Vekananda Kendra Kanyakumari | Lecture on 'Blessed is the Household' on March 26! Vasundharatai Satavalekar Memorial Lecture organized by 'Vivekananda Kendra Kanyakumari' Pune Branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Vekananda Kendra Kanyakumari | ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ या संस्थेच्या पुणे शाखेकडून ‘धन्यो गृहस्थाश्रमः’ या विषयावर सौ. वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे (Vekananda Kendra Kanyakumari). रविवार,२६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सावरकर स्मारक सभागृह(कर्वे रस्ता,डेक्कन) येथे हे व्याख्यान होणार आहे. अभ्यासक माधवी जोशी हे व्याख्यान देणार आहेत. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ या संस्थेच्या (Vekananda Kendra Kanyakumari) पुणे शाखेचे (Pune Branch) प्रमुख जयंत कुलकर्णी (Jayant Kulkarni) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘भारतीय संस्कृती’ मधील ब्रह्मचर्याश्रम,गृहस्थाश्रम,वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमातील ‘गृहस्थाश्रम’ महत्त्वाचा आहे , कारण तो इतर तीनही आश्रमांचा आधार आहे. याबद्दलच अधिक जाणून घेण्यासाठी खासकरून जे गृहस्थाश्रम स्वीकारणार आहेत अशा तरुणांनी व्याख्यानाला जरूर यावे,असे आवाहन त्यांनी केले आहे. (Pune News)

 

 

समर्पित जीवनमार्गाच्या स्मृती जपण्यासाठी उपक्रम

सौ. वसुंधराताई सातवळेकर यांनी पत्रद्वारा दासबोधाच्या सर्व परीक्षा पूर्ण करुन त्यांनी दासबोधाचा नुसता अभ्यासच नव्हे तर दासबोध प्रत्यक्ष जीवनात उतरवलेला होता.
समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद हे दोघे योद्धे संन्यासी त्यांचे आदर्श होते.
त्यांच्या कार्याचा, उपदेशाचा जीवनात कसा उपयोग करायचा हे सौ. वसुंधराताईंनी अनेक मार्गांनी शिकवले.
त्यांनी लहान मुलांसाठी संस्कार वर्ग घेतले आणि मोठ्यांसाठी प्रवचनेही केली.
त्याचप्रमाणे गोष्टीरुप मनाचे श्लोक आणि एकनाथांचे भारुड यावर पुस्तके लिहीली.
वसुंधराताईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पती भालचंद्र सातवळेकर यांच्या सहकार्याने विवेकानंद केंद्र पुणे गेल्या
वीस वर्षांहून अधिक काळ सौ वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यान आयोजित करते आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Vekananda Kendra Kanyakumari | Lecture on ‘Blessed is the Household’ on March 26! Vasundharatai Satavalekar Memorial Lecture organized by ‘Vivekananda Kendra Kanyakumari’ Pune Branch

 

हे देखील वाचा :

Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

Nitin Gadkari | नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन, जयेश पुजारीच्या नावाने धमकी; 10 कोटींची खंडणी मागितली, पोलिसांकडून तपास सुरु

NaMo Karadankad Spardha | नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 27 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार

 

Related Posts