IMPIMP

Virat Rohit Net Worth | विराट कोहली आणि रोहित शर्माकडे किती आहे संपत्ती?, जाणून घ्या कमाईमध्ये कोण पुढे… कोण मागे

by sachinsitapure

नवी दिल्ली : Virat Rohit Net Worth | T20 World Cup 2024 च्या अंतिम फेरीत ७६ धावांची खेळी करून विराट कोहली प्लेयर ऑफ द मॅच बनला तर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक पटकावून इतिहास रचला. मात्र, विजयाचा उत्सव सुरू असतानाच विराट कोहलीने टी२० अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, ज्यानंतर काही वेळातच कर्णधार रोहित शर्माने सुद्धा टी२० अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचा कायमचा निरोप घेतला. (Rohit Sharma Net Worth)

१७ वर्षानंतर विश्वचषकाचा दुष्काळ संपल्यानंतर रोहित-विराट कोहलीने अंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून एकाच वेळी संन्यास घेतला. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांचे नेटवर्थ किती आहे ते जाणून घेऊया.

रोहित शर्माचे किती नेटवर्थ?

रिपोर्टनुसार २०२३ मध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची एकुण मालमत्ता सुमारे २६ मिलियन डॉलर (२१५ कोटी रुपये) आहे. त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मॅच फी, अनेक ब्रँड्स एंडोर्समेंट आणि लीग क्रिकेट आहे. रोहित शर्माचे बीसीसीआयसोबत A+ कॉन्ट्रॅक्ट आहे. बीसीसीआयच्या २०२२-२०२३ सीझनसाठी वार्षिक खेळाडू करारानुसार रोहितला ७ कोटी रुपये वेतन मिळते.

रोहित शर्माचे कार कलेक्‍शन

रोहितला एका ओडीआय मॅचसाठी ६ लाख, टी-२० साठी ३ लाख, टेस्ट मॅचसाठी १५ लाख रुपये मिळतात. रोहित शर्माचे मासिक उत्पन्न १.२ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याच्याकडे लक्झरी कार कलेक्शन आहे. रोहितकडे बीएमडब्ल्यू, ऑडी, पोर्श आणि मर्सिडीज बेन्झ यासारख्या कार आहेत.

किती कमावतो विराट कोहली?

विराट कोहली क्रिकेटमधून कोट्यवधी कमावत आहेत. तसेच तो अनेक कंपन्यांमध्ये ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सुद्धा आहे. त्याने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यामधून त्याला मोठा रिटर्न मिळतो.

विराटचे नाव जगातील श्रीमंत क्रिकेट खेळाडूंच्या यादीत आहे. रिपोर्टनुसार, कोहलीची एकुण संपत्ती १२७ मिलियन डॉलर म्हणजे १०४६ कोटी रुपये आहे. विराटचे वार्षिक सरासरी उत्पन्न सुमारे १५ कोटी रुपये आहे. महिनाभरात तो सुमारे १,२५,००,००० रुपये कमावतो. आठवडाभराचे कोहलीचे उत्पन्न २८,८४,६१५ रुपये आणि एका दिवसाचे समारे ५,७६,९२३ रुपये आहे. उत्पन्नाच्या बाबतीत विराट कोहलीचा जगातील १०० सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये नाव आहे.

बीसीसीआयकडून मिळतात इतके पैसे

विराट कोहली भारतीय क्रिकेट टीमच्या ग्रेड ए कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. यातून त्याला कोट्यवधी रुपयांची कमाई होते. दरवर्षी आयपीएलद्वारे सुद्धा तो मोठी रक्कम कमावतो. बीसीसीआयच्या ए+ कॉन्ट्रॅक्टद्वारे त्याला वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात.

रिपोर्टनुसार, कार कलेक्‍शनबाबत बोलायचे तर त्याच्याकडे Audi Q7 (७० ते ८० लाख रुपये), Audi RS5 (सुमारे १.१ कोटी रुपये), Audi R8 LMX (सुमारे २.९७ कोटी रुपये), Audi A8L W12 Quattro (सुमारे १.९८ कोटी रुपये), Land Rover Vogue (सुमारे २.२६ कोटी रुपये) आहे.

विराट कोहली इन्व्हेस्टमेंट

इन्व्हेस्टमेंट बाबत बोलायचे तर कोहलीने Blue Tribe, Chisel Fitness, Nueva, Galactus Funware Technology Pvt. Ltd, Sport Convo, Digit सारख्या कंपन्यांच्या शेयरमध्ये गुंतवणूक केली आहे.

Related Posts