IMPIMP

Whatsapp Stock Market Scam | व्हॉट्सअ‍ॅप शेयर मार्केट स्कॅम : मनाला भुरळ पाडणारी स्वप्न दाखवून टाकतात ट्रॅप, उंदरासारखे फसतात लोक

by sachinsitapure

नवी दिल्ली : Whatsapp Stock Market Scam | एका ७१ वर्षाच्या निवृत्त व्यक्तीला स्टॉक मार्केट स्कॅममध्ये २ कोटीचा चूना लावण्यात आला. फसवणूक झालेला व्यक्ती एक फायनान्शियल प्रोफेशनल होता, याचा अर्थ त्याचे जीवन पैसा सांभाळत-सांभाळत व्यतीत झाले आहे. अशावेळी, जर कोणी फसवणूक करत असेल तर समजून जा का खुप मजबूत जाळे टाकण्यात आले आहे.

हा स्कॅम करणारा एक व्यक्ती नव्हता तर पूर्ण ग्रुप होता. तुम्ही सुद्धा बँकेत ठेवलेले पैसे चांगल्या रिटर्नसाठी गुंतवण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. हे पूर्ण प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.

ही घटना मुंबईतील आहे. ७१ वर्षांच्या व्यक्तीला एका महिलेचा फोन आला आणि तिने इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणुकीचे मनाला भुरळ पाडणारे जाळे टाकले. जेव्हा हा व्यक्ती जाळ्यात अडकला तेव्हा त्यास एक मोबाईल अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. हे बनावट अ‍ॅप, एका गुंतवणूक कंपनीच्या खऱ्या अ‍ॅपसारखेच वाटत होते. यानंतर खरा खेळ सुरू झाला.

अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर या व्यक्तीला एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले, जिथे अनेक लोक अ‍ॅक्टिव्ह होते. ग्रुपमधील लोक सतत स्क्रीनशॉट शेयर करत होते की ग्रुपमध्ये आलेल्या टिप्समुळे त्यांना खुप पैसे मिळाले आहेत. जवळपास १ महिनाभर असेच सुरू होते आणि वृद्ध व्यक्तीचा विश्वास वाढू लागला की सर्वकाही ठीक आहे. हे पाहून त्याने २४ ट्रांजक्शनच्या माध्यमातून २ कोटी रुपये डिपॉझिट केले. यानंतर काम सुरू झाले आणि व्यक्तीला कथित प्रॉफिट होऊ लागले. पाहता-पाहता त्याच्या अ‍ॅपमधील अकाऊंटमध्ये २ कोटीऐवजी १४ कोटी रुपये दिसू लागले.

जेव्हा अकाऊंटमध्ये १४ कोटी रुपयांची मोठी रक्कम दिसू लागली तेव्हा त्या व्यक्तीने त्या प्रॉफिटच्या पैशातून काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ती निघाली नाही. त्याला सांगण्यात आले की, ही रक्कम काढण्यासाठी आणखी वेगळा विड्रॉल टॅक्स अकाऊंटमध्ये जमा करावा लागेल, तेव्हा पैसे काढता येतील.

यानंतर व्यक्तीला जाणवले की त्याचे दोन कोटी रुपये सायबर गुन्हेगारांकडे पोहोचले आहेत. त्याने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.

स्कॅम असा ओळखा आणि बचाव करा

* सुपर रिटर्नचे आश्वासन असेल तर त्याबाबत रिसर्च करा, शक्यतो दूर रहा.

* फोन, एसएमएस, ईमेल अथवा सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या ऑफर्सकडे दुर्लक्ष करा. फायनान्शियल अ‍ॅडव्हायजरला प्रत्यक्ष भेटा.

* जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जॉईन केले, तर ताबडतोब बाहेर पडा. ते ब्लॉक करा.

* गुंतवणुकीसाठी घाई करूनका, विचारपूर्वक करा.

* ट्रेडिंग अ‍ॅप बोगस की खरे ते ओळखा. अ‍ॅप इतर कोणत्याही ठिकाणावरून डाऊनलोड करू नका. नेहमी गुगल प्ले स्टोअर अथवा आयओएस स्टोअरचा वापर करा. तिथेही एकुण डाऊनलोड संख्या, रेटिंग जाणून घ्या.

Related Posts