IMPIMP

White Hair Problem | पांढर्‍या केसांच्या समस्येवर रामबाण उपचार, घरातच करा ‘हे’ 3 महत्वाचे उपाय, जाणून घ्या

by nagesh
White Hair Problem | white hair natural solution black use tulsi basil curry leaves

सरकारसत्ता ऑनलाइन – White Hair Problem | एक काळ असा होता की केस पांढरे (White Hair Problem) होण्याचा संबंध वयाशी जोडला जायचा, पण आजकाल ही समस्या सामान्य झाली आहे. आता लोकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले आहेत. लहान वयातच मुलांचे केस पांढरे होत असल्याचे दिसून येत आहे. केस पांढरे होण्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावरही होतो. अशा स्थितीत त्यांच्याकडे वेळीच लक्ष देऊन ही समस्या मुळापासून दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी काही उपाय तुम्हाला मदत करतील.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

काय म्हणतात आरोग्य तज्ज्ञ?
आयुष्यातील ताणतणाव वाढल्याने आरोग्यासोबत केसांचेही नुकसान होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता आणि नैसर्गिकरित्या तुमचे केस पुन्हा काळे करू शकता.

 

केस पांढरे होण्याची कारणे (Reasons For Hair Turning White)

1. खराब जीवनशैली (Bad Lifestyle)

2. हार्मोनल बदल (Changes In Hormones)

3. केसांसाठी चुकीची प्रॉडक्ट वापरणे (Using The Wrong Product For Hair)

4. मेलॅनिन पिगमेंट कमी होणे (Melanin Pigment)

 

मेलेनिन पिगमेंट म्हणजे काय (What Is A Melanin Pigment)
मेलॅनिन पिगमेंट आपल्या केसांच्या मुळांच्या पेशींमध्ये आढळते आणि हे आपले केस काळे करण्याचे काम करते. मेलॅनिनचे उत्पादन कमी झाले की केस पांढरे होऊ लागतात. अशा स्थितीत काही उपाय करणे आवश्यक असते. (White Hair Problem)

नैसर्गिकरित्या केस काळे करण्याचे 3 मार्ग (3 ways to darken hair naturally)

1. चहापत्ती (Tea Leaves)
केसांच्या आरोग्यासाठी चहापत्ती खूप फायदेशीर आहे. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म (Antioxidant Properties) आहे, जो केसांच्या आरोग्यासाठी एक आवश्यक घटक आहे. तुम्ही प्रथम चहापत्ती पाण्यात उकळून थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर केसांच्या मुळांना लावून काही वेळ मसाज करा. सुमारे एक तासानंतर केस सामान्य पाण्याने धुवा. यानंतर, दुसर्‍या दिवशी केसांना शॅम्पू (Shampoo) करा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2. मेथीदाणे (Fenugreek Seeds)
मेथी देखील नैसर्गिकरित्या केस काळे करू शकते. मेथीमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे केस काळे ठेवण्यास मदत करतात. यासाठी दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक करून केसांच्या मुळांना लावा. तसेच, खोबरेल (Coconut Oil) किंवा बदामाच्या तेलात (Almond Oil) मिसळून केसांमध्ये हेअर पॅक (Hair Pack) म्हणूनही वापरता येईल.

 

3. आवळा (Amla)
आवळा केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, झिंक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील भरपूर असतात, जे केसांच्या मजबूतीसाठी, काळेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी आवश्यक घटक आहेत. आवळा मेहंदीसोबत वापरता येतो. ताज्या आवळ्याचा रस केसांच्या मुळांनाही लावू शकता. त्याची पेस्ट बनवूनही वापरता येते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- White Hair Problem | white hair problem natural ways to darken black colour tea leaves fenugreek amla gooseberry

 

हे देखील वाचा :

IRCTC Credit Card | रेल्वेने लाँच केले क्रेडिट कार्ड ! तिकिट बुकिंगमध्ये डिस्काऊंटसह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या

Pune Police | …म्हणून पुण्यातील ‘त्या’ पोलिस निरीक्षकास केले महिन्याभरासाठी कंट्रोल रूमशी ‘संलग्न’; पोलिस आयुक्त व सह आयुक्तांच्या कठोर कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले

Pune Crime | कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने बनवले कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरूणीचे इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट; अश्लिल मेसेज नातेवाईकांना पाठवून विनयभंग

 

Related Posts