IMPIMP

Why Credit Score Drop | वेळेवर भरले सर्व EMI, तरीसुद्धा कमी का झाला क्रेडिट स्कोअर? काय आहे कारण

by sachinsitapure

नवी दिल्ली : Why Credit Score Drop | क्रेडिट स्कोअर तुम्हाला नवीन कर्ज मिळवून देण्यासाठी खुप मदत करतो. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज लवकर आणि कमी व्याजदराने मिळू शकते. मात्र, क्रेडिट स्कोअर मेन्टेन करणे एक मोठे आव्हान असते. थोडी जरी गडबड झाली तर क्रेडिट स्कोअर १०० पॉइंटपर्यंत खाली घसरू शकतो. क्रेडिट स्कोअर खाली येण्याचे प्रमुख कारण असते, वेळेवर ईएमआय न भरणे.

परंतु वेळेवर ईएमआय भरूनसुद्धा जर क्रेडिट स्कोअर कमी झाला तर त्याचे कारण काय असू शकते. मनीकंट्रोलने अशा स्थितीचा आढावा घेऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला की अखेर असे का होते.

वेळेवर पेमेंट करून सुद्धा एका व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर ५० अंकाने खाली आला. त्याचा खर्च त्यांच्या क्रेडिट लिमिटच्या ३० टक्केन कमीच होता. त्याचे क्रेडिट स्टेटमेंट पाहिल्यावर समजले की, तो व्यक्ती दरमहिना केवळ मिनिमम ड्यू भरत होता.

या कारणामुळे त्याची देय रक्कम त्याच्या क्रेडिट लिमिटच्या ६० टक्केपेक्षा जास्त झाली, जी खुप जास्त होती. यामुळे त्याच्या क्रेडिट स्कोअरमध्ये घसरण होत होती. फुल पेमेंट केल्यानंतर ३ महिन्याच्या आत त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर सुधारला.

Related Posts