IMPIMP

Yogasana | वाढत्या वयात महिलांनी करावीत ‘ही’ 2 योगासने, लोक सुद्धा म्हणतील चाळीशीत 25 ची दिसू लागलीस

by nagesh
Yogasana | women in their 40s should do these 2 yogasana to look 25 and young

सरकारसत्ता ऑनलाइन – Yogasana | अनेकदा स्त्रिया आयुष्यात खूप काही करतात पण स्वतःची काळजी घ्यायला विसरतात. त्या आपल्या आरोग्याची आणि शरीराची पाहिजे तितकी काळजी घेत नाहीत. सौंदर्य हे बाह्य नसून अंतर्गत देखील असते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर तंदुरुस्त राहते तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. (Yogasana)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वाढत्या वयाच्या महिलांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातूनही स्वत:साठी वेळ काढला पाहिजे. काही अतिशय सोपी योगासने (Yogasana) त्या दिवसभरात करू शकतात.

 

योगासन शरीराला निरोगी, लवचिक आणि चपळ बनवण्यासोबतच इतरही अनेक फायदे देते. यामुळे तुमचे शरीर वयापेक्षा खूपच तरुण वाटू लागते. अशा स्थितीत 40 मध्येही तुम्ही 25 वर्षांच्या दिसू शकता.

 

महिलांसाठी योगासने (Yogasana for Women)
खालील 2 अशी योगासने आहेत जी महिला रोज करू शकतात. त्यांचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत.

1. चक्रासन (Chakrasana)
अभिनेत्री आशका गोरडिया देखील हे योगासन करते. चक्रासन केल्याने शरीराचे स्नायू चांगले राहतात, फुफ्फुसांना फायदा होतो, शरीराचे वजन नियंत्रणात येते आणि शरीर लवचिक होते.

 

चक्रासन करण्यासाठी पाठीवर झोपा आणि पाय जमिनीवर ठेवून गुडघे वाकवा.

आपले तळवे कानाजवळ जमिनीवर ठेवा.

आता हात पाय जमिनीवर ठेवा आणि शरीर वर उचला.

तुमचे शरीर इंद्रधनुष्याच्या आकारात येईल. डोके मागे झुकते ठेवा आणि आसन संतुलित करा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. अंजनेयासन (Anjaneyasana)
हे आसन खास वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) केले जाते. यासोबतच पचनक्रिया सुधारते, शरीरात रक्ताभिसरण चांगले राहून शरीरातील ताणतणाव कमी होऊन लवचिकताही येते.

हे आसन करण्यासाठी जमिनीवर बसून एक पाय पुढे आणि दुसरा मागे ठेवा.

आता तुमचे हात वरच्या दिशेने ओढा.

डोके मागच्या बाजूला उचला, मानेची काळजी घ्या.

आता एक मिनिट या मुद्रेत (Mudra) राहा आणि दीर्घ श्वास घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Yogasana | women in their 40s should do these 2 yogasana to look 25 and young

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गांजाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला गुन्हे शाखेकडून अटक, 23 किलो गांजा जप्त

High Uric Acid ची समस्या गायब करण्यासाठी 10 प्रभावी उपाय, लवकरच नियंत्रणात येईल लेव्हल

Pune Crime | दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्य टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Related Posts