IMPIMP

Nanded News | 2 महिला शेतातून काम करून घरी परतत असताना काळानं घातला घाला

by nagesh
nanded news | 2 women flow in flood water and died in kinwat of nanded district

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाइन Nanded News | शेतात दिवसभर काम करून घरी परतत असताना गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्यानं यात 2 महिला वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही नांदेड (Nanded News) जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील शिवणी (Shivani) याठिकाणी घडली आहे. या दोघींचा मृतदेह घटनास्थळावरून साधारण 1 किमी अंतरावर आढळून आला आहे. दुर्दैवी म्हणजे घटनेत एकाच वेळी दोघी महिला वाहून गेल्याने गावातील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रेमलाबाई लच्छन्ना तमलवाड (वय, 60) आणि मह अबी रज्जाक (वय, 61) असं त्या दोन वाहून गेलेल्या महिलांची नावे आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अधिक माहिती अशी, प्रेमलाबाई लच्छन्ना तमलवाड (Premlabai Lachhanna Tamalwad) आणि मह अबी रज्जाक (Mah Abi Razzak) या दोघी महिला अन्य काही महिला मंडळींसोबत (मंगळवारी) 24 ऑगस्ट रोजी शेतात तण काढण्यासाठी शिवणी शेतात गेल्या होत्या.
दुपारपर्यंत त्यांनी नेहमीप्रमाणे काम केलं. त्यानंतर दुपारचं जेवण आवरून त्या पुन्हा कामाला लागल्या होत्या. मात्र, साडेतीनच्या सुमारास शिवणी परिसरात अचानक जोरदार पाऊस (rain) कोसळला.
म्हणून या सगळ्या महिला शेतातच एका आडोशाला थांबला.
बऱ्याच वेळ पाऊस असल्याने त्या पाऊसातंच घरी जाण्याचा निर्णय घेत 5 महिला शेतातून शिवणी गावच्या दिशेनं निघाल्या.
परंतु शिवणी परिसरातील डोंगरावर झालेल्या जोरदार पावसामुळे (rain) शिवणी गावानजीक असणाऱ्या नाल्याला पूर आला होता. या नाल्यात वेगानं पाणी वाहत होतं.
अशात स्थितीत संबंधित 5 महिलांनी वाहत्या पाण्यातून नाला पार करण्याचं ठरवलं.

दरम्यान, या 5 महिलांनी एकमेकींच्या हाताला पकडून त्यांनी ओढा पार करण्याचा प्रयत्न केला.
या 5 महिलांपैकी 3 महिला दुसऱ्या बाजूलाही गेल्या. पण 2 महिला अद्याप वाहत्या प्रवाहातच होत्या.
तेवढ्यात त्यांचा हात सुटला. दरम्यान, इतर महिलांना काही कळायच्या आत संबंधित 2 महिला पाण्याच्या जोराच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या आहेत.
या दोघींचा मृतदेह घटनास्थळावरून साधारण 1 किमी अंतरावर आढळून आला आहे.

 

Web Title : nanded news | 2 women flow in flood water and died in kinwat of nanded district

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात भाडे तत्त्वावर घेतलेल्या 77 कारचा वापर दारुच्या वाहतुकीसाठी

Nagpur News | देवेंद्र फडणवीस यांच्या चुलत भावाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

 

Related Posts