IMPIMP

Video : शरद पवार अन् अमित शहांच्या भेटीच्या चर्चेनंतर भाजपाच्या आमदारानं शेअर केला तो व्हिडीओ, अन्…

by pranjalishirish
after pawar shah meeting bjp mla shared he video

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी (दि 28 मार्च) राजकीय वर्तुळात रंगली होती. राष्ट्रवादीनं यावर बोलताना अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगितलं आहे. परंतु तिघांचीही अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याचं वृत्त एका गुजराती वर्तमानपत्रानं दिलं होतं. यानंतर विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. अशात आता भाजप आमदारानं देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी त्यांच्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील जुना व्हिडीओ आहे. यात फडणवीस म्हणत आहेत, समंदर हूँ, लौटकर वापर आऊंगा. एकीकडे पवार-शाह Sharad Pawar यांच्या भेटीची चर्चा आहे. अशात सातपुते यांनी असा व्हिडीओ शेअर करणं म्हणजे सांकेतिक असल्याचं बोललं जात आहे. सातपुते यांनी व्हिडीओ पिन टॅगही केला आहे.


गृहखात्यानंतर आता महसूल खाते भाजपच्या ‘रडार’वर, विखे-पाटलांनी केलं थोरातांच्या खात्याबाबत सूचक वक्तव्य

‘शरद पवार अहमदाबादला होते, पण भेट नाही’

शरद पवार Sharad Pawar आणि प्रफुल्ल पटेल शुक्रवारी 26 मार्च रोजी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कुटुंबातील विवाहसोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी अहमदाबादमध्ये आले होते. वस्तुत: हा विवाहसोहळा शनिवारी दि 27 मार्च रोजी होता. परंतु अदानी परिवारातील आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते आदल्या दिवशीच अहमदाबादमध्ये आले. पवार आणि पटेल दोघंही जण अहमदाबादमध्ये असतानाच अमित शाह हेही शहरात दाखल झाले. मात्र पवार आणि पटेल यांनी शाह यांची भेट घेतली नाही. या तिघांची नुसतीच भेट झाल्याची चर्चा रविवारी माध्यमांमध्ये रंगली होती अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेससोबत निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

Also Read

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts