IMPIMP

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे; पंकजा मुंडेंची मागणी ‘रास्त’

by sikandershaikh
dhananjay-munde-pravin-darekar-pankaja-munde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)विरोधी पक्षांच्या दबावानंतर टिकटॉक स्टार पूजा राठोड मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्यावरही राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत काल भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी संजय राठोडांवर टि्वट करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. पंकजा यांनी चंद्रकांत पाटील यांच्या ट्वीटचा दाखला देत टि्वट केलं होतं.

यावर आज भाजपचे नेते, विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आम्ही संजय राठोड यांना राजीनामा देण्यासाठी दबाव वाढवला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही पंकजा मुंडे यांची मागणी रास्त आहे.

राठोड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होते की संजय राठोडांबाबत उद्धव ठाकरेंनी जे केलं ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं पाहिजे.
पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता.
हाच धागा पकडून पंकडा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली होती.

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला.
मग, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंबाबत वेगळी भूमिका का ? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला होता.
त्यावर धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्याबाबत करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यात आलेली आहे.
त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्‍नच नाही, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं होतं.
पण मुंडेबाबत मुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिका का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

‘…तर अजितदादांच्या ताफ्यावर ‘दगडी’ मारली पाहिजे’

Related Posts