IMPIMP

…अन् लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप

by amol
Raj Thackeray Security | threatening phone calls to mns chief raj thackeray says bala nandgaonkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाला Nanar project नागरिकांकडून होत असलेला विरोध पाहून नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. मात्र, कोरोनात्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल, तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’ सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पावर सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली.

नाणार प्रकल्पावर Nanar project आपली भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरे यांनी तेथील जमीन मालकांना बैठकीचे आमंत्रण दिले. नाणारवासीयांनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जमीन मालकांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, आपल्या राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाता कामा नये. या ठिकाणच्या नागरिकांच्या काही समस्या नक्कीच असतील. पण यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जावा. यावेळी नाणारवासीयांनी आमचं एवढं काम मार्गी लावा, अशी मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली.

नाणार Nanar project समर्थकांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतल्यानंतर नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. नाणार प्रकल्पाचे समर्थक आणि RRPCL कंपनीचे अधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते. सुरुवातीला मनसे नेते अनिल शिदोरे हे RRPCL कंपनीचे सीईओ बालासुब्रमण्यम अशोक व अनिल नागवेकर यांना भटले होते, असा दावा भडेकर यांनी केला. यानंतर नाणार प्रकल्पाचे समर्थक राज ठाकरे यांना 28 फेब्रुवारीलाच भेटणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना लेटबाजी करण्याचा प्लॅन शिजला व ही भेट एक आठवडा लांबणीवर पडली, असा आरोप भडेकर यांनी केला आहे.

रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी प्रसिद्धिपत्रकत म्हटले आहे की, स्थानिकांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता केवळ कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नादी लागून अचानक दोन वर्षांनी समर्थनाची थेट भूमिका मांडणे हे विश्वासघातकी कृत्य आहे. त्यामुळे आम्ही दुखावलो गेलो आहोत. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असून, कुणी कितीही प्रयत्न केला तरी रिफायनरी नाणार परिसरात येऊ देणार नसल्याचे रमाचंद्र भडेकर यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…
शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन ! नाणारबद्दल म्हणाले…
महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी
महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा ? राज ठाकरेंची ‘ही’ पोस्ट व्हायरल
मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !

Related Posts