IMPIMP

मनसुख हिरेन प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले, म्हणाले – ‘राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे’

by bali123
devendra fadnavis slams government on mansukh hiren case

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कारचा मालक मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी शुक्रवार दि 5 मार्च रोजी मृतावस्थेत सापडला. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) असं त्यांचं नाव आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता एटीएसनं हत्येचा गु्न्हा दाखल केला आहे. संशयित कारचा तपास सुरू असताना कारमालकाची हत्या झाली. या प्रकणावरून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं आहे. राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस devendra fadnavis ?
या प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरताना फडणवीस म्हणाले, राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे. मनसुख हिरेन यांचा जीव जाऊ शकतो हे मी आधीपासूनच सांगत होतो. ते सर्वात मोठे साक्षीदार होते. दुर्दैवानं त्यांचा जीव गेला. आता एटीएसनं त्यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मी सांगत होतो, तेच एटीएसच्या तपासात पुढं यायला लागलं आहे.

गृहमंत्र्यांनी सभागृहात दिली माहिती
मनसुख हिरेन प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून त्यांची हत्या झाल्याचा गुन्हा एटीएसनं दाखल केला आहे. याआधी मुंबई पोलीस गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी सचिन वाझे यांच्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही आक्षेप घेतले होते. त्या सोबतच, अँटिलिया बाहेर स्कॉर्पिओ कार थांबल्यानंतर त्या पाठोपाठ अजून एक कार देखील तिथं येऊन थांबली होती. हे देखील निदर्शनास आणून दिलं होतं. त्यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहाला माहिती दिली की, हा तपास करणाऱ्या एटीएसनं या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपास सुरू आहे असंही त्यांनी यावेळी बोलतान नमूद केलं.

Related Posts