IMPIMP

Pune BJP Protest | पुण्यात भाजप आक्रमक ! नवाब मलिकांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

by nagesh
Pune BJP Protest | Pune bjp burns ncp leader nawab malik statue in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune BJP Protest | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. मलिकांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे गंभीर आरोप केलेत. तसेच अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची बेनामी संपत्ती असल्याची कागदपत्रे सादर करणार असल्याचेही सांगितले. या खळबळजनक आरोपानंतर आता पुण्यात (Pune BJP Protest) भाजप आक्रमक झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

नवाब मलिकांनी (Nawab Malik) केलेल्या आरोपानंतर भाजपकडून (BJP) निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यात भाजपकडून देवेंद्रजी अंगार है अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातील कर्वे रस्त्यावर नवाब मलिक यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. या आंदोलनादरम्यान भारतीय जनता पार्टीचे (Pune BJP Protest) पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यावेळी जगदीश मुळीक (Jagdish Mulik) म्हणाले की, 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. ते घडवणाऱ्या आरोपींची प्रॉपर्टी विकत घेण्याचे काम मालिक (Nawab Malik) यांनी केले. ज्या लोकांनी देशद्रोह केला. या घटनेत शेकडो निरपराध व्यक्तींची हत्या झाली. अशा लोंकाची प्रॉपर्टी विकत घेऊन देशाशी गद्दारी करत नवाब मलिकने देशद्रोह केला. मलिक यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. राष्ट्रवादीने नवाब मलिकची त्वरित हकालपट्टी (Pune BJP Protest) केली पाहिजे. त्याला मंत्रीपदावर राहता येणार नाही. ज्या शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा दिला. देशद्रोहाला मदत करणाऱ्या अशा मंत्रीबाबत शिवसेनेने दखल घेऊन कारवाई (Pune BJP Protest) केली पाहिजे. असे ते म्हणाले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

काय म्हणाले मलिक?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या प्रकरणाचा तपास भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी 2008 मध्ये नोकरीवर येतो आणि 14 वर्षांत मुंबईबाहेर जात नाही, यामागचं कारण काय? असा सवाल मलिक (Nawab Malik) यांनी विचारला आहे.

तसेच, रियाझ भाटी कोण आहे? 29 ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. 2 पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो 2 दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Pune BJP Protest | Pune bjp burns ncp leader nawab malik statue in pune

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 83 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sanjay Raut | ‘आता भाजपने नौटंकी बंद करावी’ – संजय राऊत

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेवर घणाघाती आरोप, म्हणाले…

Maharashtra Rains | विकेंडला राज्यात मुसळधार ! पुण्यासह 11 जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

 

Related Posts