IMPIMP

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेवर घणाघाती आरोप, म्हणाले…

by nagesh
Gopichand Padalkar On Thackeray Government | mahavikas aghadi conspiracy to deprive obc of political representation allegation of bjp leader gopichand padalkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्यभरात 35 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या (ST employees commit suicide) केली. आपली लढाई मूकबधिर, आंधळ्या सरकारसोबत आहे. पोराला खायला आणू शकत नाही म्हणून एसटी कर्मचारी असलेल्या बापानं आत्महत्या केली. धुळ्यात महिला एसटी कर्मचारीनं कुटुंबासह आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसणं गरजेचं होते. मात्र या सरकारने कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस देतेय. मराठीचा मुद्दा घेऊन मताचे राजकारण करतायेत ज्या 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली ते मराठी नाहीत का? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray government) केला आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आझाद मैदानावरील (Azad Maidan) मोर्चाला संबोधित करीत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या?

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, एसटी कर्मचारी बायकापोरं घेऊन मुंबईत आले आहेत. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडायची नाही. भाजपचा (BJP) एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाशी (ST Workers Agitation) संबंध नाही. कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त आंदोलन केले आहे. त्याला पाठिंबा देणं आमचं कर्तव्य आहे. आज आडवाल तर उद्या काय करला. गरिबांना पैसे द्यायला नाहीत का? तुमचा दसरा, दिवाळी गोड केला, गोरगरिब एसटी कर्मचाऱ्यांचे काय? दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी सरकारला विचारला आहे.

प्रत्येक प्रवाशावर 1 रुपया कर आकारला जातो. रोज 65 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. महिन्याचे 21 कोटी होतात हे पैसे जातात कुठं? हे पैसे मातोश्रीवर (Matoshree) जातात. कर्मचाऱ्यांना पैसे द्यायची वेळ आली तेव्हा महामंडळ तोट्यात असल्याचे सांगितले जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एसटी डेपोत भ्रष्टाचार

एक डिझेल टँकर डेपोकडे जातो तर एक विकायला जातो. एसटी डेपोत भ्रष्टाचार केला जातोय. मग महामंडळ कसं फायद्यात येईल. तुम्ही भ्रष्टाचार करत असाल आणि त्याचा फास कर्मचाऱ्यांभोवती आवळला जातोय. सरकारने निर्णय घेतला नाही तर सर्व कर्मचारी मंत्रालयावर धडक देतील, असा इशारा त्यांनी दिला.

 

Web Title: Gopichand Padalkar | st workers agitation azad maidan bjp mla gopichand padalkars allegations against shiv sena

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | विकेंडला राज्यात मुसळधार ! पुण्यासह 11 जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

PF Account | तुमच्या पीएफ खात्यामध्ये व्याजाचे पैसे कोणत्या हिशेबाने आले; जाणून घ्या

MPSC Exam | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदत वाढ

 

Related Posts