IMPIMP

Sharad Pawar | एकाचवेळी ED च्या इतक्या कारवाया यापुर्वी कधी पाहिल्या होत्या का? – शरद पवार

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar became doctor honor dedicated farmers country in ahmednagar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर निॆशाणा साधला आहे. ईडी’ कडून नाहक त्रास देण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे. या आगोदर ईडीच्या कारवाया तुम्ही कधी पाहील्या होत्या का? असा जोरदार सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ED कडून सुरू असलेल्या कारवाया केंद्र सरकार पुरस्कृत असल्याचा जोरदार आरोप पवार (Sharad Pawar) यांनी केला.
त्यावेळी ते पुण्यामध्ये (Pune) एका नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सध्या ईडीच्या रडारवर असलेल्या शिवसेना नेत्या आणि खासदार भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांच्या संस्थांवर सक्तवसुली संचालनालय (ED) कडून छापेमारी केल्याच्या विषयावरुन बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, भावना गवळी यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ED आणि CBI सारख्या संस्थांचा वापर करुन केंद्र सरकार संपूर्ण देशभर व राज्यात अनावश्यक त्रास देण्याचं काम करत आहे. तसेच, ईडीच्या कारवाया म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम असल्याचं देखील शरद पवार म्हणाले आहेत.

 

दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, रिझर्व्ह बँकेचं नागरी सहकारी बँकांबाबतचं नवं धोरण पाहिलं असता
देशातून नागरी सहकारी बँका बंद करण्याचा रिझर्व्ह बँकेचा इरादा दिसतो आहे. असं म्हणत शरद पवार
(Sharad Pawar) यांनी रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. विशिष्ट लोकांच्या हाती
सूत्रं देऊन सहकार क्षेत्र संपविण्याचा घाट केंद्राकडून सुरू असल्याचा देखील हल्लाबोल पवार यांनी केला आहे.

 

Web Title : Sharad Pawar | have you ever seen actions ed unnecessarily done says sharad pawar

 

हे देखील वाचा :

Murder in Dhule | नवीन दुचाकी खरेदी करुन घरी परतणाऱ्या डॉक्टरचा सपासप वार करुन खून

Sadabhau Khot | आ. सदाभाऊ खोतांच्या मुलाचा युवा आघाडी अध्यक्षाच्या घरात सशस्त्र ‘राडा’, 4 जणांवर FIR

7th Pay Commission | मोदी सरकारकडुन दिवाळी दरम्यान ‘या’ कर्मचाऱ्यांना मिऴु शकते मोठी भेट

 

Related Posts