IMPIMP

Ajit Pawar On Amol Kolhe | अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका, म्हणाले, नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना

by sachinsitapure

पुणे : Ajit Pawar On Amol Kolhe | बारामतीचे मतदान झाल्याने (Baramati Lok Sabha) अजित पवार आता इतर मतदारसंघांकडे वळले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti NCP Candidate) शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यासाठी अजित पवार सभा घेत आहेत. कदमवाक वस्ती (Kadamwak Wasti), ता. हवेली (Haveli) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Candidate) उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

अजित पवार म्हणाले, शिरूर लोकसभेतून गेल्या वेळेस निवडून आलेल्या खासदाराला मतदारसंघात फिरायला वेळच मिळाला नाही कारण त्यांच्यामागे नाटक, कार्यक्रमाच्या शूटिंगची कामे असतात. मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न व विकासकामांसाठी त्यांना वेळ देता आला नाही.

अजित पवार पुढे म्हणाले, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूक हरल्यानंतर देखील मतदारसंघात संपर्क ठेवला. त्यांना निवडून दिल्यावर केंद्रातील व राज्यातील देखील भरघोस निधी मिळेल व आपल्या परिसरात मोठमोठी विकासकामे होतील.

तर उमेदवार आढळराव म्हणले, अधिक विकासकामे करण्याकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. त्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून मला निवडून द्यावे. पंधरा वर्षे मी खासदार असताना, डड्ढीम प्रकल्प केले होते, पुणे नाशिक हायवे याचा मार्गसुद्धा मीच निर्माण केला होता. त्यासोबत लोणी काळभोर येथील सोळाशे कोटींचा पाणी प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान, लोणी काळभोरच्या या सभेला लोणी काळभोर (Loni Kalbhor) व कदमवाक वस्ती ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यशवंत सहकारी साखर कारखाना (Yashwant Sahakari Sakhar Karkhana) संचालक, बूथ कमिटी सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांना EVM ची पूजा पडली महागात, सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Related Posts