IMPIMP

Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातावर अखेर अजित पवार बोलले, ”कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असूदे, कारवाई होणारच”

by sachinsitapure

पुणे : Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघाताची देशभर चर्चा होत असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र मौन बाळगून होते. यावरून आज शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर अजित पवार यांनी मौन सोडले असून त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असूदे, कारवाई होणारच, असे त्यांनी म्हटले आहे. ते पुण्यात एका शोरूमच्या उद्घाटनासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते. (Kalyani Nagar Accident)

अजित पवार म्हणाले, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाकडे माझे बारकाईने लक्ष आहे. घटना समजल्यापासून पहिल्या दिवसापासून या घटनेकडे लक्ष आहे. या प्रकरणावर मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत देखील चर्चा केली. दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

अजित पुढे पवार म्हणाले, मी २० आणि २२ तारखेला सकाळी ९ वाजेपासून मंत्रालयात होतो. मी या घटनेच्या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून होतो. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे बोलणे झाले होते. देवेंद्रजी मला म्हणाले की, मी तातडीने पुण्याला निघालो आहे. मी स्वत: त्याकडे जातीने लक्ष घालणार आहे.

फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजात केला जातोय की, या प्रकरणाकडे पालकमंत्र्याचे लक्ष नाही. मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मीडियाच्या अनेक लोकांना माहिती आहे. मी माझे काम करत असतो. आजही चेक करा की, अजित पवार २१ तारखेला सकाळी मंत्रालयात होता की नाही, असा खुलासा अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, एकतर या प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होता कामा नये. ही घटना अतिशय गंभीर आहे. अशाप्रकारच्या घटना कदापि होता कामा नये. कायदा सुव्यवस्था उत्तम राखणे हे पोलीस खात्याचे काम आहे.

या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याबद्दल मला वेळोवेळी पोलीस आयुक्त जी माहिती द्यायची होती ती देत होते. पोलीस आयुक्तांनी स्वत: तुमच्यासमोर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. मी आजही पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यांनी प्रत्येक मिनिटामिनटाला काय-काय घडले याविषयी सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

ते म्हणाले, अल्पवयीन आरोपीला बेल कशी मिळाली? हे देखील तुम्हाला समजले आहे. त्याबाबत वेगवेगळ्या बातम्या आल्या. न्यायालयाने बेल का द्यावी हा न्यायालयाचा प्रश्न आहे. या प्रकरणी ज्या गोष्टी कडक घेतल्या जायला हव्यात तशा कडक घेतल्या गेल्या आहेत.

या प्रकरणात कोणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे. स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पालकमंत्री म्हणून लक्ष घातले आहे. तीव्रता कमी झाल्यावर मग फाटे फुटतात. पब संस्कृती वाढली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु झाली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Related Posts