IMPIMP

All Liquor-Alcohol Shops Closed In Pune | पुणे : उद्या वाईन शॉप, बार (मद्यविक्री) बंद! जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

by sachinsitapure

पुणे : – All Liquor-Alcohol Shops Closed In Pune | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करीता पुणे (Pune Lok Sabha), मावळ (Maval Lok Sabha), शिरुर (Shirur Lok Sabha), बारामती (Baramati Lok Sabha) या मतदारसंघात 7 मे आणि 13 मे रोजी मतदान पार पडले. या मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (दि. 4) होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 4 जून रोजी संपूर्ण दिवस सर्व मद्यालये, मद्य विक्री दुकाने आणि इतर मद्यविषयक आस्थापना बंद राहणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी निर्गमित केले आहेत. (Lok Sabha Election Results)

जिल्ह्यात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघात व मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान झाले. मतदानाच्या 48 तास अगोदर सर्व मद्य विक्रीच्या, ताडी विक्रीच्या व इतर संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजे मंगळवार 4 जून रोजी संपूर्ण दिवसासाठी हे आदेश लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार उद्या पुणे शहरात मद्यविक्री बंद असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949 व त्याअंतर्गत लोकप्रतिनिधीत्व अधिनियमन 1951 अंतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘या’ ठिकाणी होणार मतमोजणी

बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये, शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव, ता. शिरुर येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये तर मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात

सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रुम) सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आदी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. प्रारंभी सकाळी ८ वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल.

EVM मतमोजणीची सुरुवात 8.30 वाजता

ईव्हीएमच्या मतमोजणीची सुरूवात 8 वाजून 30 मिनिटांनी होईल. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार असून याशिवाय व्हिडीओ कॅमेराद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.

Related Posts