IMPIMP

Amol Kolhe | बारामतीमधील त्या प्रकारानंतर अमोल कोल्हेंची मागणी, मतदानाच्या दिवशी शिरूरमधील ‘या’ बँकांवर पोलिस बंदोबस्त ठेवा

by sachinsitapure

पिंपरी : Amol Kolhe | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे वर्चस्व आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Barmati Lok Sabha) मतदानाच्या पूर्वसंध्येला बँकेची भोर (Bhor) येथील शाखा रात्री उशिरापर्यंत सुरु होती. बँकेतून पैसे वाटप करत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, पवार यांनी शिरूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघातही (Shirur Lok Sabha) असाच पैसे वाटण्याचा प्रकार घडण्याची दाट शक्यता व्यक्त करत अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचे वर्चस्व असलेल्या बँकांमध्ये बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे.

शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मागणी केली आहे की, शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांवर पोलीस बंदोबस्त ठेवावा. या बँक आणि पतसंस्थेतून पैसे वाटप होण्याची शक्यता आहे, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

सोमवारी, १३ मे रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यासाठी वरील मागणी डॉ. कोल्हे यांनी निवडणूक निर्णय अधिकाèयांना पत्र देऊन केली आहे.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिरुर मतदारसंघात अनेक ठिकाणी शाखा आहेत. या शाखांमधूनही पैसे वाटप होण्याची शक्यता आहे, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी या मागणीत म्हटले आहे.

Related Posts