IMPIMP

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | सभेला जाऊ नका, मविआ कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा, डॉ. अमोल कोल्हे यांचा महायुतीसह आढळरावांवर गंभीर आरोप

by sachinsitapure

पिंपरी : Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Lok Sabha) निवडणूक चुरशी होता-होता आता दडपशाहीकडे वळली की काय, अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कारण, येथील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर (Mahayuti) गंभीर आरोप केला आहे. येथील महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील हे पराभव दिसू लागल्याने सत्तेचा गैरवापर करत असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रचारावेळी डॉ. कोल्हे यांनी हा आरोप केला. यावेळी माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजी आढळराव-पाटील यांनी दत्तक घेतलेल्या करंजविहिरे गावामधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून सभेला जाऊ नये, यासाठी नोटिसा पाठविल्या. आढळराव यांना कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली आहे. दत्तक घेतलेल्या गावातील लोकांवरच दडपशाही केली जात आहे.

नोटिसा पाठविण्याची वेळ येत असेल तर आढळराव यांना पराभव स्पष्ट दिसायला लागला आहे. दडपशाही सुरू असून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत जनता उभी आहे, असे कोल्हे म्हणाले.

डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, ही निवडणूक आता माझी राहिली नाही. सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे. भोसरी, हडपसर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरमध्ये प्रत्येक ठिकाणी जनतेचा निर्णय झाला आहे. जनता आता फक्त मतदानाची वाट पाहत आहे.

दरम्यान, कोल्हे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवाजी आढळराव पाटील यांनी म्हटले की, मी जिथे जिथे जातो, तेथील लोक आम्ही चुकलो असे सांगतात. खासदार अमोल कोल्हे यांनी लोकांची काहीच कामे केली नाहीत. त्या आधी १५ वर्षांत मी ठळक कामे केली आहेत. समाजमाध्यमावर माझ्याबाबत नकारात्मक वातावरण तयार केल आहे.

Related Posts