IMPIMP

Pune ACB Demand Case On PSI | पुणे : तीन लाख रुपये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर (PSI) एसीबीकडून गुन्हा दाखल

by sachinsitapure

पुणे :  – Pune ACB Demand Case On PSI | गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडी अंती तीन लाख रुपये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सर्जेराव शेगर (Dattatraya Sarjerao Shegar) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. दत्तात्रय शेगर हे पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. एसीबीच्या या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pune ACB Trap)

याबाबत 40 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे महावितरण विभागात नोकरी करतात. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात मिटर चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे पीएसआय शेगर यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्याचा तपास आपण स्वत: करीत असून पुढील कारवाई न करण्यासाठी शेगर यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडी अंती 3 लाख रुपये लाच मागितली. (PSI Dattatraya Shegar)

याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे याबाबत तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेगर यांनी तक्रारदार यांच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपये लाच मागून तीन लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने पीएसआय दत्तात्रय शेगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव करीत आहेत. (Bribe Case Pune)

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीच्या पथकाने केली.

Pune Divisional Flying Squad | पुणे विभागीय भरारी पथकाकडून 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

Related Posts