IMPIMP

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | आढळरावांनी घेतली रामलिंगाची खोटी शपथ ! स्वतःचा बचाव करण्यासाठी किती रंग बदलणार? – डॉ. अमोल कोल्हे यांचा थेट सवाल (Video)

by sachinsitapure

शिरूर : Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळरावांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे देऊन आढळराव पाटील यांना चांगलेच घेरले आहे. मात्र संबंधित पुरावे समोर आल्याने भांबावलेल्या आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामलिंगाची शपथ घेऊन; आपण आपल्या व्यवसायाच्या फायद्यासाठी संसदेत प्रश्न विचारले नसल्याचे म्हटले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संसदेत त्यांच्या कंपनीच्या व्यवसायाच्या (डिफेन्स) संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे काही पुरावे समोर आणत; हा फक्त ट्रेलर असून; संपूर्ण चित्रपट येणे अजून बाकी असल्याचे म्हटल्याने आढळराव पाटील चांगलेच धास्तावले असल्याचे बोलले जात आहे. या आरोपांचा डिफेन्स (प्रतिकार) करणे आढळरावांना अवघड जात असल्याने त्यांनी चक्क शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या रामलिंगाची शपथ घेऊन टाकली.

खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूर येथे पार पडलेल्या सभेत शिरूर लोकसभा मतदार संघातील तमाम जनतेची मते घेऊन संसदेत गेलेल्या आढळराव पाटील यांनी स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढरे करणारे प्रश्न विचारून मतदारसंघातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे म्हटले होते. यावर आढळराव पाटील यांनी संबंधित आरोपाचे पुरावे दिले तर मी निवडणुकीतून माघार घेतो असेही म्हटले होते. यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी हे आवाहन स्वीकारत आढळरावांनी विचारलेल्या प्रश्नांचा गठ्ठाच समोर ठेवला. मात्र आढळराव पाटील यांनी कोल्हे यांनी चुकीचे पुरावे दिले असून मला याविषयी काही बोलायचे नाही, असे म्हणत चर्चेला पूरणविराम देण्याचा प्रयत्न केला.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचे आवाहन स्वीकारून पुरावे समोर आणल्यानंतर दिलेला शब्दाप्रमाणे आपल्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की येऊ नये म्हणून; आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांनी दिलेले पुरावे योग्य नसल्याचे सांगत रामलिंगाची खोटी शपथ घेतल्याचा आरोप खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.

वेबसाईटवर डिफेन्स साठीची उत्पादने बनवत असल्याची माहिती

माजी खासदार आणि महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या डायनालॉग कंपनीच्या वेबसाईटवर कंपनी बनवत असलेल्या अनेक उत्पादनांची माहिती दिली असून; आढळरावांनी विचारलेल्या प्रश्नांचा आणि या उत्पादनांचा थेट संबंध असल्याचे दिसते आहे.

Related Posts