IMPIMP

Amol Kolhe | पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने अमोल कोल्हे भावुक; म्हणाले – ‘अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु…’

by sachinsitapure

पुणे: Amol Kolhe | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) खासदार अमोल कोल्हे यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उपनेता , मुख्य प्रतोद म्हणून अमोल कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अमोल कोल्हे यांनीच समाजमाध्यमातून दिलेली आहे. नवी जबाबदारी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पोस्टमध्ये अमोल कोल्हे म्हणालेत की, ‘एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले आहे. ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Lok Sabha) जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे.

लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सौ. सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार!, असे अमोल कोल्हे म्हणाले.

Related Posts