IMPIMP

Avinash Bhosale Bail Granted | पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर

by sachinsitapure

पुणे :- Avinash Bhosale Bail Granted | पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना अखेर जामीन मंजुर झाला आहे. मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) हा जामीन मंजुर केला आहे. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अविनाश भोसले यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. सीबीआयच्या (CBI) एका खटल्यात हा जामीन देण्यात आला असून आणखी एका प्रकरणात त्यांना जामीन मिळणं बाकी आहे.

अविनाश भोसले हे मागील दोन वर्षापासून कोठडीत आहेत. येस बँक (Yes Bank Scam) आणि डीएचएफएल घोटाळा (DHFL Scam) प्रकरणात 26 मे 2022 रोजी त्यांना पहिल्यांदा सीबीआयने अटक केली होती. चुकीच्या पद्धतीने काही कर्ज दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर दुसरीकडे मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली ईडीकडून (ED) देखील त्यांचा तपास सुरु आहे.

अविनाश भोसले यांनी एक वर्षापूर्वी हायकोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांना आज सीबीआयच्या प्रकरणात हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. परंतु अद्याप ईडीच्या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाले नाही. त्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होते का हे पहावं लागले.

काय आहे अटक प्रकरण?

– येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून याआधी चौकशी
– 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले
– वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
– सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता
– बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश
– ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त.

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

Related Posts