IMPIMP

Baramati Lok Sabha | सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना आयोगाची नोटीस, प्रचार खर्चात आढळली तफावत, दोन दिवसात करावा लागणार खुलासा

by sachinsitapure

पुणे : Baramati Lok Sabha | बारामती लोकसभेची निवडणूक यावेळेस पवार विरूद्ध पवार अशी लढत असल्याने सातत्याने चर्चेत आहे. आता मात्र येथून वेगळीच बातमी समोर येत आहे. निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना नोटीस पाठवली आहे.

निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत उमेदवाराने दाखविलेला आणि प्रशासनाकडील खर्चात तफावत आढळल्याने ही नोटीस दोन्ही उमेदवारांना पाठवण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी (Kavita Dwivedi) यांनी ही नोटीस बजावली असून दोन दिवसांत खुलासा न दिल्यास ही तफावत मान्य असल्याचे ग्राह्य धरून हा खर्च त्यांच्या खात्यात दाखविला जाणार आहे.

प्रचार खर्चाची दुसरी तपासणी करताना बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक खर्चात तफावत आढळली. सुप्रिया सुळे यांच्या खर्चात १.३ लाख आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या खर्चात ९.१० लाख रुपये तफावत आढळली.

दरम्यान दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधीने ही तफावत अमान्य केली आहे. प्रशासनाने या संदर्भात दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले असले तरी उमेदवारांना या संदर्भात जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागता येईल.

Related Posts