IMPIMP

Bibvewadi Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

by sachinsitapure

पुणे :- Bibvewadi Pune Crime News | पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिबवेवाडी परिसरात एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) अल्पवयीन मुलावर सुधारित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.1) रात्री आठच्या सुमारास पिडीत मुलीच्या राहत्या घराजवळ घडला आहे.

याबाबत 14 वर्षाच्या पीडित मुलीने मंगळवारी (दि.2) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर भारतीय न्याय संहिता 64/2/एम, 65/1, 74 पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. सोमवारी रात्री आठच्या सुमारास आरोपीने मुलीचा हात पकडून जबरदस्तीने घराशेजारी असलेल्या बोळीत नेले.

आरोपीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. तसेच मागील दोन महिन्यापूर्वी पीडित मुलीचे आई-वडील घरात नसताना आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच अश्लील चाळे केले. याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts