IMPIMP

Chandrakant Patil | एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवसानिमित्त संकल्प

by sachinsitapure

पुणे: Chandrakant Patil | पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांची संख्या आणि टेकड्या यांची महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे ही बाब समोर ठेवून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Birthday) यांनी आपला यंदा १० जून रोजीचा वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला असून, आपल्या ६५ व्या वाढदिवशी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आदी जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात ६५ हजार वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. या संकल्पात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन नामदार पाटील यांनी केले आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील हे आपला वाढदिवस नेहमीच सामाजिक कार्यासाठी समर्पित करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी आपला वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित केला होता. याअंतर्गत कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, पुष्पगुच्छ, हार-तुरे नकोत, तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांवर उपचारासाठी आणि मुलींना शिक्षणासाठी निधी संकलनात योगदान देण्याचे आवाहन केले होते.

नामदार चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, भरीव निधी संकलन झाले होते. या संकलित निधीतून कोथरुडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील १०९७ रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले होते. तसेच, ३०० मुलींना शिक्षणासाठी मदत करण्यात आली.

यंदा नामदार चंद्रकांत पाटील यांनी आपला वाढदिवस वृक्ष संवर्धनासाठी समर्पित केला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आदी जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागात एकूण ६५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात कोथरुड मधील महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागातील टेकड्यांवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच, याचे जतन करुन, त्याच्या वाढीसाठी सर्वप्रकारचे नियोजन केले आहे.‌ यासाठी वन विभागाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.

त्यामुळे पुणेकरांचे उद्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. दिनांक ९ जून रोजी सकाळी ७ वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Related Posts